no images were found
‘प्यार का पहला नाम राधा मोहन’मध्ये अब्दू रोझिक बनला अपहरणकर्ता
गतवर्षी प्रसारणास प्रारंभ झाल्यापासूनच ‘झी टीव्ही’वरील ‘प्यार का पहला नाम राधा मोहन’ ही मालिका प्रेक्षकांची अतिशय आवडती मालिका बनली आहे. आजच्या काळातील वृंदावनमध्ये घडणारी ही एक प्रेमकथा आहे. मालिकेचे कथानक मन गुंतवून ठेवणारे असून त्याला मिळणार््या कलाटण्या आणि मोहन (शब्बीर अहलुवालिया), राधा (निहारिका रॉय) दामिनी (संभाबना मोहन्ती) आणि तुलसी (कीर्ती नागपुरे) यासारख्या सहज भावणार््या व्यक्तिरेखांमुळे प्रेक्षकांमध्ये मालिकेची उत्सुकता कायम राहिली आहे. गेल्या काही भागांमध्ये प्रेक्षकांनी पाहिले की रुग्णालयातून घरी आल्यावर मोहनने आता पुन्हा ऑफिसला जावे, यासाठी राधाने त्याचे मन कसे वळवले आहे.
मालिकेत इतक्या नाट्यपूर्ण घडामोडी घडत असताना प्रेक्षकांना आता मालिकेत ताजिकिस्तानचा लोकप्रिय गायक अब्दू रोझिक याचा प्रवेश पाहायला मिळेल. त्याच्या प्रसन्न आणि मोहक व्यक्तिरेखेला अगदी छेद देणारी एक छोटी भूमिका अब्दू साकारणार आहे. ही भूमिका आहे एका अपहरणकर्त्याची. आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना दिसेल की सारे कुटुंबीय गुनगुनच्या (रीझा चौधरी) वाढदिवसाच्या पार्टीची तयारी करत असताना दामिनी आणि कावेरी (मनिषा पुरोहित) या तिचे अपहरण करण्याचा कट आखीत असतात. या प्रसंगाच्या संदर्भातच प्रेक्षकांना अब्दू रोझिकचा प्रवेश होताना दिसेल.
अब्दू रोझिक म्हणाला, “माझ्या टीव्हीवरील पहिल्याच मालिकेत पाहुण्या कलाकाराची भूमिका रंगवण्यास मी उत्सुक बनलो आहे. माझ्या व्यक्तिरेखेचं नावही अब्दू असंच आहे. तो अपहरणकर्ता आहे. मुंबईत आल्यापासून मी बरेच कार्यक्रम केले असले, तरी आता मी प्रथमच एक काल्पनिक व्यक्तिरेखा रंगवणार आहे. मी दुसर््याला भीती वाटण्यास प्रयत्न करणार््या एका लाघवी अपहरणकर्त्याची भूमिका कधी साकारेन असं मला कधी वाटलंच नव्हतं. यातील सर्वात चांगली गोष्ट कोणती असेल, तर माझे बहुतांशी प्रसंग हे यातील बालकलाकार रीझा चौधरी हिच्यासोबतच आहेत. प्रेक्षकांना आम्हा दोघांना पाहायला खूप आवडेल, असं मला वाटतं. मालिकेतील सर्व कलाकार आणि कर्मचारी हे खूपच प्रेमळ आणि अगत्यशील आहेत. त्यांच्याबरोबर चित्रीकरण करताना मला खूप मजा आली.”
आपली पहिलीच व्यक्तिरेखा साकारण्यासाठी अब्दू रोझिक उत्सुक बनला असला, तरी गुनगुनला अपहृत होण्यापासून राधा आणि मोहन हे कसे वाचवतात, ते पाहणे प्रेक्षकांसाठी खूपच रोमांचकारक ठरेल. गुनगुनचे अपहरण करण्याचा कट दामिनीने आखला होता, ही गोष्ट मोहनला समजेल का?