
no images were found
छात्र सेना पथकाचे वार्षिक प्रशिक्षण शिबीर : वस्तुच्या पुरवठ्यासाठी दरपत्रकाची मागणी
कोल्हापूर : एन. सी. सी. भवन कोल्हापूर येथे माहे सप्टेंबर 2023 ते नाव्हेंबर 2023 या कालावधीत 56 महाराष्ट्र राष्ट्रीय छात्र सेना पथक, कोल्हापूर यांचे वार्षिक प्रशिक्षण शिबीर होणार आहे. या शिबीरासाठी आवश्यक असलेल्या वस्तुंच्या पुरवठ्यासाठी दरपत्रकाची मागणी करण्यात आली आहे.
दरपत्रक मागणी करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये सर्व प्रकारची सकाळी न्याहारी, सकाळी चहा, बिस्कीट, दुपारी जेवण, संध्याकाळी चहा बिस्कीट, संध्याकाळी शाकाहारी व मांसाहरी जेवण प्रती दिन, प्रती व्यक्ती दर यांचा समावेश आहे.
इच्छुकांनी आपली दरपत्रके समादेशक अधिकारी, 56 महाराष्ट्र राष्ट्रीय छात्रसेना पथक, एनसीसी भवन, दुसरा मजला, शिवाजी विद्यापीठ आवार, कोल्हापूर येथे सादर करावी, असे कर्नल पुनीत गोगिया यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.