
no images were found
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाची नवीन सभासद नोंदणी सुरु
कोल्हापूर : शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील वाचकांना त्यांच्या आवडीचे दर्जेदार वाचनीय साहित्य उपलब्ध करुन देऊन त्यांना वाचनाची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, कोल्हापूर या कार्यालयाने नवीन वैयक्तिक सभासद व संस्था सभासद नोंदणी सुरु केली आहे. वैयक्तिक सभासदांसाठी विहित नमुन्यातील अर्जाची किंमत 10 रुपये आहे. अनामत रक्कम व प्रवेश शुल्काची रक्कम कार्यालयात रोखीने भरावी लागेल. वैयक्तिक सभासदत्व स्विकारल्यानंतर एका वेळी एक ग्रंथ 14 दिवसांसाठी व संस्था सभासद स्विकारल्यानंतर एका वेळी 25 ग्रंथांचा एक संच एक महिन्याच्या मुदतीकरीता देवघेव पध्दतीने दिला जाईल.
अधिक माहितीसाठी "जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, 2078, श्रीराम निवास, आकाशगंगा अपार्टमेंटसमोर, राजारामपूरी 11 वी गल्ली, कोल्हापूर" दूरध्वनी क्रमांक 0231- 2521404, या कार्यालयास सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत संपर्क साधावा. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, कोल्हापूर या कार्यालयात विविध विषयावरील दर्जेदार वाचनीय ग्रंथ वाचकांसाठी उपलब्ध आहेत. तसेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास
करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य अभ्यासिका उपलब्ध आहे. याचा सर्व अभ्यासकांनी लाभ घ्यावे. तसेच जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, कोल्हापूर या कार्यालयाचे वैयक्तिक व संस्था सभासदत्व स्विकारुन दर्जेदार व वाचनीय साहित्याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर यांनी केले आहे.