Home राजकीय जेष्ठ, अनुभवी नेत्यांना ‘मनसे’त स्थान द्यावे : हेमंत पाटील

जेष्ठ, अनुभवी नेत्यांना ‘मनसे’त स्थान द्यावे : हेमंत पाटील

0 second read
0
0
30

no images were found

जेष्ठ, अनुभवी नेत्यांना मनसेत स्थान द्यावे : हेमंत पाटील

मुंबई / पुणे : सध्याच्या अस्थिर राजकीय परिस्थितीकडे एक संधी म्हणून बघा.आपल्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहून भेटीगाठी वाढवण्याच्या सूचना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी मुंबईत पार पडलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केली होती. तसेच लवकरच ते राज्यव्यापी दौरा करणार असून येत्या २५ ऑगस्टपासून मनसेची सदस्य नोंदणी सुरू करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. परंतु, पक्ष विस्तारासाठी मुळात पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी त्याचा रागीट आणि हट्टी स्वभाव बदलावा, असे आवाहन राजकीय विश्लेषक आणि इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी बुधवारी केले.

ठाकरे म्हणजे मनसे आणि मनसे म्हणजे ठाकरे असे समीकरणच झाले आहे .त्यामुळे संघटन विस्तारासाठी उत्कृष्ट वक्त्यासह कुशल संघटक असणे देखील तेवढेच महत्वाचे आहे. या शिवाय ठाकरे यांनी प्रत्येक विभागात चांगल्या पद्धतीने काम करणारे जेष्ठ, अनुभवी आणि हुशार राजकारणी लोकांना स्थान दिले पाहिजे. केवळ तरुण, अनुभवहीन आणि हुल्लडबाजी करणाऱ्या घेऊन पक्षाचे आमदार-खासदार निवडून येणार नाही. उत्तम राजकीय स्थितीची जान असणारे आणि पक्ष विस्ताराला समर्पित अश्या कार्यकर्त्यांची फळी ठाकरेंना उभारावी लागेल. ठाकरे यांनी त्यांची भूमिका बदलली पाहिजे. हट्टीपणा ,रागीट  स्वभाव बदलला पाहिजे. मनमिळाऊ स्वभाव अंगिकारला पाहिजे. संघटन कौशल वाढवले पाहिजे, लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजे. तेव्हाच सर्वसामान्यांना मनसे आपला पक्ष वाटेल,  असे मत पाटील यांनी व्यक्त केले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…