no images were found
जेएसडब्ल्यू स्टीलचा ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी बनावट कंपन्यांशी लढा
कोल्हापूर : स्थानिक कायदा अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आज महालक्ष्मी पत्रा डेपो, कणेरीवाडी, गोकुळ शिरगाव, कोल्हापूरच्या परिसरात धाड टाकली. स्थानिक किरकोळ विक्रेता जेएसडब्ल्यू कलरऑन + (जेएसडब्ल्यू स्टीलशी संबंधित नोंदणीकृत ट्रेडमार्क) या ब्रँड नावाखाली बनावट, उप-मानक दर्जाची, गॅल्वनाइज्ड रूफिंग शीट्सची विक्री करीत आहेत असे आढळून आले. जेएसडब्ल्यू स्टील ही वैविध्यपूर्ण भारतीय समूह जेएसडब्ल्यू ग्रुपची प्रमुख कंपनी आहे. जेएसडब्ल्यू स्टीलच्या ब्रँड अंतर्गत बनावट स्टील उत्पादनांच्या विरुद्धच्या लढ्यात हा विकास आणखी एक टप्पा आहे आणि अधिक महत्त्वाचे म्हणजे ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणे हे आहे.
गोकुळ शिरगाव, कोल्हापूर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी ही धाड टाकली. धाडी दरम्यान अधिकाऱ्यांनी किरकोळ विक्रेत्याकडून बनावट छतावरील शीट्स तसेच शीट्स बनवण्यासाठी वापरलेले 100 किलो प्लास्टिक फिल्म रोल जप्त केले. किरकोळ विक्रेत्याने विकलेल्या बनावट उत्पादनांमुळे लक्षणीय नुकसान होत होते आणि ग्राहकांमध्ये असलेल्या जेएसडब्ल्यू च्या प्रदीर्घ प्रस्थापित ट्रेडमार्कच्या प्रतिष्ठा, सद्भावना आणि विश्वासाला नुकसान पोहोचत होते.
जेएसडब्ल्यू स्टीलच्या अधिकृत प्रवक्त्याने सांगितले, “जेएसडब्ल्यू स्टील आपल्या मूल्यवान ग्राहकांना उच्च दर्जाची उत्कृष्ट उत्पादने देण्यावर विश्वास ठेवते. जेव्हा छतावरील शीट्स जेएसडब्ल्यू सारख्या प्रस्थापित ब्रँडची बनावट म्हणून विकली जातात तेव्हा ही समस्या अधिक गंभीर बनते आणि त्याद्वारे ग्राहकांची संपूर्ण सेगमेंट्स मध्ये फसवणूक होते. सब-स्टँडर्ड मटेरियल वापरून बनवलेल्या या बनावट उत्पादनांचे आयुष्य कमी असते आणि आमच्या ग्राहकांची सुरक्षा धोक्यात आणू शकते.”
जेएसडब्ल्यू स्टील, नावीन्यपूर्ण आणि उच्च दर्जाच्या उत्पादनांसाठी प्रसिद्ध आहे, आणि ग्राहकांच्या लवचिक, हवामान-प्रूफ शीट्सशी संबंधित गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांनी कलरऑन + कलर कोटेड गॅल्वनाइज्ड रूफिंग शीट्स सादर केल्या आहेत. जेएसडब्ल्यू ने जेएसडब्ल्यू कलरऑन + कलर कोटेड शीट्सवर गुणवत्तेचे मार्किंग देखील सादर केले. या गुणवत्तेच्या मार्किंगचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ते न पुसता येण्याजोगे आहे आणि स्टोअरमध्ये खरेदी दरम्यान ग्राहक ते सहजपणे तपासू शकतात. जेएसडब्ल्यू स्टीलचे गुणवत्तेचे मार्किंग त्यांचे उत्पादन बनावटी उत्पादनांपासून वेगळे करते कारण बनावट उत्पादनांमधील मार्किंग केलेले लाइनर सहज मिटवले जाऊ शकते.