Home आरोग्य टावी प्रक्रियेने बदलविला हृदयाचा वॉल्व; शस्त्रक्रियेशिवाय उपचार

टावी प्रक्रियेने बदलविला हृदयाचा वॉल्व; शस्त्रक्रियेशिवाय उपचार

24 second read
0
0
43

no images were found

टावी प्रक्रियेने बदलविला हृदयाचा वॉल्वशस्त्रक्रियेशिवाय उपचार

 

 नागपूर-६७ वर्षीय रुग्णाचा शुद्ध रक्तवाहिनीचा व्हॉल्व (ॲओर्टिक वॉल्व) निकामी झाला होता. त्यामुळे त्यास हृदयासंबंधी गुंतागूंत निर्माण होत होती. त्याच्यासमोर व्हॉल्व बदलविण्याची ओपन हार्ट सर्जरी हा एक पर्याय होता. मात्र, आता नागपुरातही अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत असल्याने ‘ट्रान्सकॅथेटर अॅओर्टिक वॉल्व रिप्लेसमेंट’(TAVI) हा चिरफाड केल्याशिवाय व्हॉल्व बदलविण्याचा पर्याय होता. वोक्हार्ट हॉस्पिटल येथे त्या रुग्णावर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनमोल सोनावणे यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली. त्यांना हृदयरोगतज्ज्ञ डॉ. नितीन तिवारी, डॉ. अमेय बीडकर, कार्डियोव्हॅस्कुलर सर्जन डॉ. सुमीत पाठक, भूलतज्ज्ञ डॉ. पंकज यांच्या चमूने सहकार्य केले.

           रुग्णास उच्चरक्तदाब, मुत्रपिंडाचा त्रास अशा कोमॉर्बिडिटीज् असल्याने ओपन हार्ट सर्जरीमध्ये जोखिम होती. अशा वेळी ‘ट्रान्सकॅथेटर अॅओर्टिक वॉल्व रिप्लेसमेंट’ हाच एकमेव पर्याय असतो. जर ॲकोर्टिक वॉल्व निकामी झाली असेल, तर रुग्णाचे जीवनमान कर्करोग रुग्णांपेक्षाही कमी असू शकते व अचानक हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. रुग्णाने देखील वेळ न दडवता वॉल्व बदलविण्याची प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. आता रुग्णाची परिस्थिती चांगली असून रक्तपुरवठा सुरळीत झाला आहे.

ट्रान्सकॅथेटर अॅओर्टिक वॉल्व रिप्लेसमेंट मध्ये अॅन्जियोग्राफी व अॅन्जियोप्लास्टी प्रमाणे हातातून एक नळी (कॅथेटर) रक्तवाहिनीद्वारे ह्रदयापर्यंत नेण्यात येतो. पेसमेकरद्वारे हृदयाची स्पंदने २५० बीट प्रति मिनिट पर्यंत वाढविण्यात येतात. हृदय स्थिर झाले की, कृत्रिम कॅथेटरद्वारे नेण्यात आलेल्या वॉल्वला हृदयात उघडण्यात येतो. कालांतराने तो स्थिर झाला की, कॅथेटर काढून घेतल्या जातो. विशेष म्हणजे ही शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णास सुंगणी देण्याची गरज नसते. रुग्ण शुद्धीवर असताना ही प्रक्रिया होऊ शकते. चिरा देण्याची गरज नसल्याने रक्तस्त्राव होण्याचा धोका नसतो. रुग्णाला तीन-चार दिवसात इस्पितळातून सुटी देखील मिळते.

ज्या रुग्णांना ओपन हार्ट सर्जरी जोखिमीची आहे, त्यांच्यासाठी ही उपचारपद्धती प्रभावी आहे. वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये सर्व स्पेशालिटीचे डॉक्टर आणि अत्यंत सुविधेने युक्त अतिदक्षता विभाग असल्यानेच ही प्रक्रिया येथे होऊ शकते. अशा प्रकारच्या प्रक्रिया आता नागपुरात शक्य असल्याने रुग्णाला बाहेर जावे लागत नाही. शिवाय बाहेरून ही प्रक्रिया करण्यासाठी देखील रुग्णांचा ओढा नागपूरकडे असल्याने दिसून येत आहे. त्यामुळे नागपूर मेडिकल हब म्हणून नावाजल्या जात आहे.

डॉ. नितिन तिवारी,हृदयरोगतज्ज्ञ,वोक्हार्ट हॉस्पिटल,नागपूर म्हणाले की,’’टावी ही प्रक्रिया ज्यांना ओपन हार्ट सर्जरीची जोखिम आहे, त्यांच्यासाठी वरदानच आहे. हृदयशास्त्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आता चिरफाड न करताही वॉल्व रिप्लेसमेंट शक्य झाले आहे.

 

  

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…