no images were found
भाजपकडून सूचक इशाराच : -शिंदे यांच्या गटाची कोंडी
मुंबई :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवूनही राज्यातील राजकीय वातावरण बदलण्यात फारसे यश येत नाही हे भाजप नेत्यांच्या निदर्शनास आले असल्याचे सूत्रांनी सांगितलं.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याशी त्यांचे अजिबात पटत नसे. रायगडमधील शिवसेनेच्या तिन्ही आमदारांनी तटकरे यांच्या विरोधात तक्रारी केल्या होत्या.सत्ताबदल होताच शिंदे गटाने खासदार सुनील तटकरे व त्यांच्या कन्येची मतदारसंघात अडवणूक करण्याचा प्रयत्न केला होता.
मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागेल या आशेवर असणाऱ्या शिंदे गटातील आमदार सत्तेत तिसरा वाटेकरी आल्याने अस्वस्थ असल्याच्या चर्चेने आता जोर धरला असून स्थानिक राजकारणातही राष्ट्रवादीतून सत्तेत सहभागी झालेल्या आमदारांच्या स्पर्धेला शिंदे गटाला तोंड द्यावे लागणार आहे.
२०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यातून ४० पेक्षा अधिक खासदारांचे पाठबळ मोदी यांना मिळाले होते. महाविकास आघाडीशी सामना करणे कठीण असल्याची जाणीव भाजपच्या नेत्यांना झाली होती. यातूनच राष्ट्रवादीत फूट पाडण्याची खेळी भाजपने केली. अजित पवार यांना बरोबर घेऊन भाजपने शिंदे यांचे महत्त्व आपसूकच कमी केले आहे.
शिंदे गटाचे काही मंत्री व आमदारांमुळे भाजपची डोकेदुखी वाढली होती. यातूनच मध्यंतरी काही मंत्र्यांना वगळण्याची सूचना शिंदे यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली होती.
राष्ट्रवादीचा एक गट बरोबर आल्याने शिंदे गट आता दबावाचे राजकारण करू शकणार नाही. मध्यंतरी जाहिरातीवरून भाजपने शिंदे गटाच्या विरोधात जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती.
अजित पवार यांना बरोबर घेऊन भाजपच्या नेतृत्वाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सूचक इशाराच दिला आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आणि त्यातही अर्थमंत्री असलेले अजित पवार यांच्याकडून निधी वाटपात सातत्याने अन्याय होत असल्याची ओरड करत थेट बंडाचा झेंडा उगारणाऱ्या शिंदे यांच्या गटातील आमदारांची नव्या घडामोडींमुळे कोंडी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.