Home क्राईम तब्बल ३० फुट खोल खड्ड्यात कार कोसळून चालक ठार

तब्बल ३० फुट खोल खड्ड्यात कार कोसळून चालक ठार

1 second read
0
0
35

no images were found

तब्बल ३० फुट खोल खड्ड्यात कार कोसळून चालक ठार

संभाजी नगर : पुन्हा एक समृद्धी महामार्गावरील अपघात झाल्याची घटना पुढे आली आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील जयपूर-भांबर्डा शिवारात अपघाताची घटना घडली आहे. हा अपघात पहाटेच्या सुमारास घडला.

सुशील कुमार थोरात असे या अपघातात ठार झालेल्या कार चालकाचे नाव आहे. या घटनेत त्याची पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार थोरात हे संभाजीनगरहून जालनाच्या दिशेने हात होते. यावेळी त्यांची कार ही भरधाव वेगात होती. यावेळी कारवरील नियंत्रण सुटल्याने त्यांची गाडी ही थेट मार्गाच्या डाव्या बाजूला असणाऱ्या तब्बल ३० फुट खोल खड्ड्यात कोसळली.हा अपघात एवढा भीषण होता की गाडीचा चक्काचूर झाला.सुशीलकुमार थोरात यांचा जागीच मृत्यू झाला.

 थोरात हे वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील रहिवासी आहेत.घटनेची माहिती मिळताच करमाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अपघात ग्रस्त कार बाहेर काढण्यात आली.

Load More Related Articles

Check Also

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी “सहकार दरबार”

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी “सहकार दरबार”   को…