
no images were found
हँड एम्ब्रॉयडरी कारागिरांना सुधारित टूलकिटचे वाटप
कोल्हापूर – केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय अंतर्गत विकास आयुक्त कार्यालय (हस्तकला) व राष्ट्रीय हस्तकला विकास कार्यक्रम योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील 30 हँड एम्ब्रॉयडरी हस्तकला कारागिरांसाठी सुधारित टूलकिटचे वाटप दिनांक 25 ऑगस्ट 2022 रोजी खासदार धनंजय महाडिक व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त (हस्तकला) चंद्रशेखर सिंग यांनी दिली आहे.
हा कार्यक्रम दिनांक 25 ऑगस्ट 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराबाई सभागृहात सकाळी 11:30 वाजता होणार आहे.तरी उपरोक्त कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहून हस्तकला कारागिरांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन श्री. सिंग यांनी केले आहे.