Home शैक्षणिक तंत्रज्ञान अधिविभागाच्या १७ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड

तंत्रज्ञान अधिविभागाच्या १७ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड

1 second read
0
0
137

no images were found

तंत्रज्ञान अधिविभागाच्या १७ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागातील केमिकल इंजिनिअरिंगमधील १७ विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतींमधून विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभागातील केमिकल इंजिनिअरिंग विभागातील बी.टेक. अंतिम वर्षात (शैक्षणिक वर्ष २०२१-२२) शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अधिविभागात कॅम्पस मुलाखतींचे आयोजन करण्यात आले. त्यातून बी.टेक. केमिकल अभियांत्रिकीच्या अंकेष चौगुले, ओंकार माने, वाल्मिक पाटील, सोहम भोले, सचिन कदम, दिव्या गव्हाणे, विदयुल्लता धर्मे, ऋतुजा खडके,समीक्षा मोरे, साईराज शिंदे, श्रेयस मिठारी, श्याम पाटील, वैष्णवी महाडिक, प्रीतम जामदार, पियुष सिंग, अक्षय राठोड आणि प्रणव कदम या विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड करण्यात आली आहे. यामध्ये टीसीएस (पुणे), इन्फोसिस (पुणे), इंजिनेरो टेक्नालॉजिज् (ठाणे), ब्लॅक अॅन्ड विच इंडिया लिमिटेड (पुणे), डब्लूटीई इन्फ्रा प्रोजेक्टस प्रा. लि. (पुणे), अल्काईल अमाइन्स केमिकल्स लि. (पुणे), विनवेज् केमटेक (मुंबई) आणि ग्लेनमार्क लाईफ सायन्सेस प्रा. लि. (सोलापूर) या केमिकल क्षेत्रातील नामांकित कंपन्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र – कुलगुरू  डॉ.  प्रमोद  पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे,  तंत्रज्ञान अधिविभागाचे प्रभारी  संचालक डॉ. पी. डी. पाटील, तंत्रज्ञान  अधिविभागाचे ट्रेनिंग अॅन्ड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. एस. बी. सादळे,  डॉ.  जे. डी. पाटील  तसेच शिवाजी विद्यापीठाचे  सेंट्रल ट्रेनिंग अॅन्ड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. जी.एस. राशीनकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच केमिकल इंजिनिअरिंग अधिविभागातील डॉ. डी. एम. नांगरे, एस. एम. गायकवाड, ए. बी मडावी, पी. पी. पाटील, डॉ. आर. पी. कलनके,  श्रीमती व्ही. एस. मोहिते आणि श्रीमती एस. पी. देहनकर  यांनी याकरिता विशेष परिश्रम घेतले.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

विकास विषयक कामे समन्वयाने व्हावीत – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

विकास विषयक कामे समन्वयाने व्हावीत – पालकमंत्री प्रकाश आबिटकर    &nbs…