
no images were found
टेम्पो आणि दुचाकीच्या भीषण अपघात दोघांचा जागीच मृत्यू
सातारा : जिल्हातील खंडाळा तालुक्यातील पंढरपूर फाटा-फलटण रस्त्यावरील लोणी येथील एका वळणावर टेम्पो आणि दुचाकीच्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू घटना घडली आहे . दुचाकीचालक मनोज परमार (वय २१), अजय जाधव (वय २१) दोघेही (रा. सुरवडी, ता. फलटण) अशी दोघांची नावे आहेत.ही घटना काल रात्री साडेनऊच्या वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरवडी येथील तीन तरुण महाबळेश्वर, पाचगणी येथे फिरण्यासाठी गेले होते. रात्री उशिरा गावाकडे परतत असताना पंढरपूर फाट्याजवळ पोलीस वाहनांची तपासणी करत होते. हे तिघे जण दुचाकीवर ट्रिपल सीट होते. पोलिसांना पाहून तिघांपैकी एकजण गाडीवरून खाली उतरला.
त्यानंतर हे दोघेजण पंढरपूर फाट्यावरून सुरवडीकडे जात असताना लोणी येथील वळणावर, फलटणकडून येणाऱ्या टेम्पोला दुचाकीची जोराची धडक बसली. हा अपघात एवढा भीषण होता की , यात दोन तरुणांचा जागीच मृत्यु झाला.
या अपघाताची माहिती मिळताच शिरवळ पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला आणि त्यानंतर त्यांचे मृत्यदेह शिरवळ प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. दोन तरुणांच्या अपघाती मृत्यूमुळे सुरवडी गावावर मोठी शोककळा पसरली आहे.