no images were found
अनिकेत चौहानने दिलेली अप्रतिम आदरांजली पाहून कुमार सानू झाले मंत्रमुग्ध
या रविवारी ‘3 तासांच्या विशेष’ भागात सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियाज बेस्ट डान्सर या डान्स रियालिटी शो मध्ये मनोरंजनाचा अतिरिक्त डोस मिळणार आहे. एकापाठोपाठ अनेक आठवडे हे स्पर्धक उत्तम परफॉर्म करून आपल्या अद्भुत डान्सिंग कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर आपला ठसा उमटवत आहेत. स्पर्धेतील चढाओढ आता आणखी तीव्र झाली आहे. या ‘नया दौर’मध्ये स्पर्धकांना नव्या चाचणीला सामोरे जावे लागेल. यामध्ये त्यांना आपल्या डान्सची जादू दाखवावी लागेल. ही रजनी विशेष चमकदार करण्यासाठी गाण्याच्या क्षेत्रातील चमकता तारा कुमार सानू या भागात उपस्थित राहणार आहे. यावेळी स्पर्धक ‘सुपरहिट संडे विथ कुमार सानू’ विशेष भागात रोमॅंटिक मेलडीजचा बादशाह कुमार सानूला आदरांजली वाहताना दिसतील.
या भागात स्पर्धकांचे एकापेक्षा एक सरस परफॉर्मन्स बघायला मिळतील. आपल्या अॅक्टमध्ये रोमान्स, प्रेम आणि मस्ती दाखवून ते कुमार सानूच्या सुपरहिट गाण्यांची जादू पसरवताना दिसतील. या भागात केवळ डान्स प्रतिभाच नाही, तर इतरही कलाकार उपस्थित राहून प्रेक्षकांना मस्त मेजवानी देणार आहेत. हे आमंत्रित कलाकार आहेत, इंडियन आयडॉलचे स्पर्धक ऋषी सिंह आणि देबोस्मिता रॉय, कॉमेडीयन जय विजय आणि नितेश शेट्टी तसेच उत्कृष्ट डान्सर्स सनम जोहर आणि सुशांत खत्री आणि इंडियाज बेस्ट डान्सरच्या पहिल्या सत्राचा विजेता टायगर पॉप.
स्पर्धक अनिकेत चौहान आणि कोरिओग्राफर गौरव सरवन ‘लाल दुपट्टे वाली’ गाण्यावर जबरदस्त परफॉर्मन्स देऊन सर्वांना थक्क करून सोडतील. त्यांचा तो धमाल परफॉर्मन्स पाहून परीक्षकांचे मनोरंजन तर होईलच पण हसून हसून त्यांची पुरेवाट होईल. त्यांच्या परफॉर्मन्सने प्रभावित झालेला कुमार सानू असे म्हणताना दिसेल की, “या सुंदर आदरांजलीबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला परफॉर्म करताना बघताना खरोखर खूप मजा आली. मला वाटते, हा मंच हेच अनिकेतचे गुरुकुल आहे. तो कोणत्याही संस्थेतून किंवा गुरुकडून डान्स शिकलेला नाही, पण तो काय कमाल नाचतो! तो इतका जबरदस्त डान्सर आहे, की त्याने आपल्या पॅशनचा पाठपुरावा न थकता करत राहायला पाहिजे असे मला वाटते.”
आपल्या संगीत प्रवासाची आठवण सांगताना कुमार सानू म्हणाला, “मी जेव्हा 8 वर्षांचा होतो, तेव्हा मी घरी तबला वाजवायचो. 1979 मध्ये एका कार्यक्रमात मी गायकांना साथ करत होतो आणि अनपेक्षितपणे मला गाणे म्हणावे लागले. मी घाबरलो होतो, पण त्यावेळी मी अपना देश चित्रपटातले ‘दुनिया में लोगों को’ ही गाणे म्हटले. लोकांनी माझे टाळ्या वाजवून खूप कौतुक केले. मी मंचावर थरथरत होतो आणि लोकांना वाटले की मी डान्स करतो आहे. प्रत्यक्षात मात्र मी खूप घाबरलो होतो.”
अनिकेतच्या प्रवासाचे कौतुक करताना गीता कपूर म्हणाली, “कोणत्याही गुरूचे मार्गदर्शन नसताना सोशल मीडिया आणि टेलिव्हिजनवरून शिकून अनिकेतने जी प्रगती केली आहे, ती लक्षणीय आहे. त्याच्या परफॉर्मन्समध्ये ऊर्जा, भावना आणि नाट्य ठासून भरलेले असते. तू ज्या पद्धतीने परफॉर्म करतोस ते मला फार आवडते आणि अर्थात तुझा गोड मिश्किलपणा! तुला डान्स करताना बघणे ही एक पर्वणी असते.”
थोडी गंमत करत कुमार सानू अनिकेतला बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानची नक्कल करायला सांगेल. अनिकेत सुपरस्टार शाहरुख खानचे हावभाव हुबेहूब साकारत त्याची नक्कल करेल, जी पाहून सगळ्यांचे भरपूर मनोरंजन होईल. सगळ्यांच्या हसण्याने या एपिसोडचे वातावरणच अगदी हलके-फुलके होऊन जाईल.