no images were found
महाराष्ट्रातील १.४ करोड प्रेक्षक पहिल्या आठवड्यापासूनच ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद २’ च्या प्रेमात
स्टार प्रवाहवर नुकत्याच सुरु झालेल्या मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादच्या दुसऱ्या पर्वाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमाचा पहिला भाग महाराष्ट्रातील १.४ करोड प्रेक्षकांनी अभुभवला. पहिल्या आठवड्यापासूनच प्रेक्षकांचं मिळणारं हे उदंड प्रेम अभूतपूर्व आहे. या कार्यक्रमाचं वेगळेपण म्हणजे या मंचावर फक्त आणि फक्त मराठी गाणी सादर केली जातात. सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आणि गायक सचिन पिळगावकर, लोकप्रिय गायिका वैशाली सामंत आणि तरुणाईच्या गळ्यातला ताईत असणारा गायक आदर्श शिंदे यांचं मार्गदर्शन आणि सोबतीला सुप्रसिद्ध अभिनेत्री वैदेही परशुरामीचं खुमासदार सूत्रसंचालन या कार्यक्रमाची शोभा दिवसागणिक वाढवत आहे.
मराठी परंपरा मराठी प्रवाह हे स्टार प्रवाह वाहिनीचं ब्रीदवाक्य सार्थ ठरवत छोटे उस्ताद मराठी गाण्यांचा निखळ आनंद रसिक श्रोत्यांना देत आहेत. येत्या आठवड्यात प्रेक्षकांना आषाढी एकादशी विशेष भाग अनुभवता येणार आहे. विठ्ठल हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. एकादशी निमित्ताने वारकरी मोठ्या भक्तीभावाने पायीपायी विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात. छोटे उस्ताद आपल्या सुरांच्या माध्यमातून विठुरायापुढे नतमस्तक होणार आहेत. तेव्हा छोट्या उस्तादांचा सांगितीक प्रवास नक्की अनुभवा दर शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.