no images were found
मनी लाँड्रिंग प्रकरणात EDची कारवाई, अटकेनंतर मोठी माहिती उघड
नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनाने (ED) रिअल इस्टेट ग्रुप M3Mचे संचालक बसंत बन्सल यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली असून ईडीने रिअल इस्टेट डेव्हलपर्सशी संबंधित दिल्ली आणि गुरुग्राममधील ७ ठिकाणी छापे टाकून ईडीने काही दिवसांपूर्वी रूप कुमार बन्सलला अटक केली होती.
दोन्ही भावांवर मनी लाँड्रिंगचा आरोप असून केंद्रीय एजन्सीने M3M ग्रुप आणि IREO ग्रुपने ४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त पैशांची लाँड्रिंगची माहिती मिळाली, त्यानंतर कारवाई करण्यात आली. ईडीने नुकतेच IREO ग्रुप आणि M3M ग्रुपच्या ठिकाणांवर छापे टाकले. यादरम्यान ६० कोटींच्या आलिशान गाडी आणि ६ कोटींचे दागिने जप्त केले.
तपास यंत्रणा ED ने दिलेल्या माहितीनुसार M3M समूहाला IREO समुहाकडून अनेक स्तर असलेल्या अनेक शेल कंपन्यांच्या माध्यमातून ४०० कोटी रुपये मिळाले. त्यानंतर ही रक्कम विकास हक्कामार्फत देयक म्हणून दाखवण्यात आली. ही जमीन M3M ग्रुपची होती आणि तिचे बाजारमूल्य ४ कोटी रुपये होते. कंपनीने ही जमीन पाच शेल कंपन्यांना १० कोटी रुपये देऊन विकली. यानंतर, शेल कंपन्यांनी त्याच जमिनीचे विकास हक्क IREO समूहाला सुमारे ४००कोटी रुपयांना विकले, जे त्वरित हस्तांतरित करण्यात आले. पैसे मिळाल्यानंतर शेल कंपन्यांनी पैसे M3M ग्रुपला ट्रान्सफर केले. या शेल कंपन्या M3M समूहाद्वारे चालवल्या जात होत्या, असे एजन्सीच्या या प्रकरणाच्या पुढील तपासात उघड झाले आहे.