Home राजकीय जाहिरात प्रकरणानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आज पुन्हा एकत्र

जाहिरात प्रकरणानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आज पुन्हा एकत्र

4 second read
0
0
32

no images were found

जाहिरात प्रकरणानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आज पुन्हा एकत्र

मात्र आता या नाराजीनाट्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री नाराज असल्याची चर्चा असताना शिंदे फडणवीस आज एकत्र येणार आहे.

शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने पालघरमध्ये मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र येणार आहेत.दोघेही एकाच हेलिकॉप्टरमधून प्रवास करणार आहेत.

 गेले दोन दिवस फडणवीस यांनी कानदुखीचं कारण देत मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत कार्यक्रमात एकत्र येणं टाळलं होतं. वादग्रस्त जाहिरातीमुळे फडणवीस नाराज असल्याचीही चर्चा होती. त्यामुळे कोल्हापुरातील कार्यक्रमाला फडणवीसांनी उपस्थिती टाळल्याची चर्चा होती. मात्र आज दोघेही एकत्र येत असल्याने नाराजी दूर होत वादावर पडदा पडल्याची चर्चा आहे.

 ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ या शिंदे गटाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीरातीवरून भाजपमध्ये नाराजी पसरल्याची चर्चा होती.

 शिंदे पुढे वा फडणवीस मागे हा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. तर  एकनाथ शिंदे यांना ठाणे म्हणजेच पूर्ण महाराष्ट्र वाटू लागला आहे. मात्र, बेडूक कितीही फुगला, तरी हत्ती होऊ शकत नाही, अशा  शब्दांत भाजप नेते व राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी टिका केली होती.

दरम्यान, जाहिरात वादानंतर आता शिवसेनेच्या वतीनं महत्त्वाचं स्पष्टीकरण देण्यात आलंय आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संबंधित जाहिरात थांबवण्याचे आदेश दिले होते, असा दावा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीत केला.ही जाहिरात हेतूपुरस्सर दिलेली नव्हती, असं सांगतानाच उपमुख्यमंत्र्यांचा फोटो नसणं ही तांत्रिक चूक असल्याचं केसरकरांनी यावेळी सांगितलं.

दुसरीकडे, आज (गुरुवारी) मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ऊस दर नियंत्रण समिती आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मुंबईत बैठक होणार आहे. पालघरमधील कार्यक्रम झाल्यावर सह्याद्री अतिथीगृहात राजू शेट्टी आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात चर्चा होईल.ऊस दर नियंत्रण समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या संदर्भात सूचना केली होती. त्याचसोबत दोन टप्प्यात एफआरपी देण्याचा कायदा पूर्ववत करण्याबाबत आजच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्याचसोबत गारपीट, अतिवृष्टी, पीकविम्याची रक्कम तातडीने जमा करण्याची मागणीही केली जाणार आहे.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…