no images were found
शरद पवार धमकी प्रकरणात पुण्यातून एकाला अटक
पुणे : बनावट सोशल मीडिया अकांऊट तयार करून शरद पवार यांना धमकी दिली होती. शरद पवार यांचा दाभोळकर होणार असल्याचं त्याने म्हटलं होतं.
या धमकीनंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. तातडीनं या प्रकरणाचा तपास करावा अशी मागणी करण्यात आली होती.
पोलिसांनी पुण्यामधून एका तरुणाला अटक केली आहे. सागर बर्वे असं या तरुणाचं नाव आहे. बर्वे हा आयटी इंजिनियर असल्याची माहिती समोर येत आहे.
अखेर या प्रकरणात सागर बर्वे याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शरद पवार यांना ट्विटरवरून जीवे मारण्याची धमकी एका युजरने दिली होती. त्याने तुमचा दाभोळकर करू असं म्हटलं होतं. शरद पवार यांना आलेल्या धमकीनंतर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन कारवाईची मागणी कोली होती. आता या प्रकरणात पोलिसांनी पुण्यातून सागर बर्वे नावाच्या तरुणाला अटक केली आहे.