no images were found
हे जे काही घडतंय एकट्याचे हे काम नव्हे दंगल घडवली जातेय : शरद पवार
संभाजीनगर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे छत्रपती संभाजीनगरमध्ये सौहार्द बैठकीसाठी उपस्थित होते. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यात त्यांनी कोल्हापूर, अहमदनगरमधील तणावाच्या परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली.
कोल्हापुरातील घटनेवर लगेच रस्त्यावर उतरून त्याला धार्मिक स्वरुप देणं योग्य नाही. सत्ताधारी लोकच रस्त्यावर उतरणे योग्य नाही. त्यामुळे दोन समाजात कटुता निर्माण होतेय आणि हे चांगलं लक्षण नाही.
तसंच औरंगजेबाचे पोस्टर दाखवले, त्यावर आंदोलन करणे कशासाठी. हा काय विषय आहे का आंदोलनाचा अशा शब्दात शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. लव्ह जिहादबाबत आपण बोलणे म्हणजे नाही त्या विषयावर बोलणे होय. विनाकारण अशा प्रश्नांवर बोलणे चुकीचे आहे.
नांदेडमध्ये घडलेली घटना हे चांगले प्रकार नाहीत. सर्वात लहान घटकाला न्याय देण्याची सरकारची जबाबदारी आहे. मुस्लिम आणि ख्रिश्चन समाज या घटकांबाबत जाहीर बोललो. संरक्षण देण्याची गरज आहे. पेशव्यांबाबत केलेले वक्तव्य विचारसरणी नुसार आहे.
ओडिशासह काही राज्यात चर्चवर हल्ले झाले. ख्रिश्चन समाज हा शांतताप्रिय आहे. कोणाची चूक असल्याच पोलिसांनी कारवाई करावी. त्यासाठी धार्मिक स्थळांवर हल्ला कशाला? हे जे काही घडतंय ते सहज नाहीय. एकट्याचे हे काम नव्हे आणि यामागे काही विचारधारा असून त्या समाजाच्या हिताच्या नाहीत असं म्हणत शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली.
राज्यात सातत्याने घडणाऱ्या धार्मिक दंगलीवर भाष्य करताना शरद पवार म्हणाले की, राज्यात सातत्याने दंगली घडतायत. धार्मिक दंगली मर्यादित भागात झाल्यास चिंतेचा विषय नाही. पण असे प्रकार घडत नाहीत तर ते घडवले जात आहेत.