Home Uncategorized आयसीआयसीआय बँके तर्फे टाटा मेमोरियल सेंटरसाठी १२०० कोटी रुपयांचा निधी

आयसीआयसीआय बँके तर्फे टाटा मेमोरियल सेंटरसाठी १२०० कोटी रुपयांचा निधी

0 second read
0
0
43

no images were found

आयसीआयसीआय बँके तर्फे टाटा मेमोरियल सेंटरसाठी १२०० कोटी रुपयांचा निधी

 

मुंबई : आयसीआयसीआय बँकेने आज देशातील प्रतिष्ठित कर्करोग उपचार आणि संशोधन केंद्र असलेल्या टाटा मेमोरियल सेंटरला टीमसी १२०० कोटी रुपयांचा निधी पुरवणार असल्याचे जाहीर केले आहे. आयसीआयसीआय बँकेतर्फे सीएसआर निधीमधून ही रक्कम दिली जाणार आहे. या रकमेच्या मदतीने ७.५ लाख चौरस फुटांच्या जागेत तीन नव्या इमारती स्थापन केल्या जातील, शिवाय टीएमसीच्या महाराष्ट्रातील नवी मुंबई, पंजाबमधील मुल्लानपुर आणि आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील केंद्रात अत्याधुनिक यंत्रणा बसवली जाईल.

टीएमसीला आतापर्यंत एखाद्या संस्थेकडून मिळालेला हा सर्वात मोठा निधी असून तो आयसीआयसीआय बँकेच्या आयसीआयसीआय फाउंडेशन फॉर इनक्लुसिव्ह ग्रोथ या सीएसआर विभागातर्फे दिला जाणार आहे. याच विभागाद्वारे संपूर्ण उपक्रमाची अमलबजावणी केली जाणार असून तो २०२७ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

आधुनिक उपकरणे आणि खास मल्टीडिसिप्लिनरी टीम्सच्या मदतीने ही आँकोलॉजी उपचारांची नवी केंद्रे दर वर्षी किमान २५,००० नव्या रुग्णांना आधुनिक थेरपीज देतील. ही आकडेवारी सध्याच्या संख्येच्या दुप्पट असून त्यामुळे देशातील कर्करोग उपचार यंत्रणेला मोठी चालना मिळेल.

आयसीआयसीआय फाउंडेशनने यासाठी टीएमसी बरोबर करार केला आहे. आयसीआयसीआय फाउंडेशनचे अध्यक्ष संजय दत्ता आणि टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. आर. ए. बडवे यांनी या करारावर सह्या केल्या. यावेळी आयसीआयसीआय बँकेचे अध्यक्ष गिरीशचंद्र चतुर्वेदी आणि आयसीआयसीआय बँकेचे कार्यकारी संचालक संदीप बात्रा उपस्थित होते.

श्री. चतुर्वेदी यांनी आज परेळ, मुंबई येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटल मधील आयसीआयसीआय एमआरआय सुविधेचेही उद्घाटन केले. यावेळी डॉ. बडवे आणि श्री. बात्रा उपस्थित होते. या विभागात आयसीआयसीआय फाउंडेशन तर्फे पुरवण्यात आलेले आधुनिक एमआरआय मशिन बसवण्यात आले आहे.

याप्रसंगी आयसीआयसीआय बँकेचे अध्यक्ष श्री. गिरीशचंद्र चतुर्वेदी म्हणाले, आयसीआयसीआय बँकेला देशाची सेवा करण्याचा जुना वारसा लाभला आहे. आयसीआयसीआय फाउंडेशन सातत्याने नागरिकांच्या कल्याणासाठी झटत असून त्यासाठी पर्यावरण संवर्धन, कौशल्य विकास, वाजवी आरोग्य सेवा, समाज विकास उपक्रम हाती घेतले जातात आज आम्ही नवी मुंबई, मुल्लानपूर आणि विशाखापट्टणम येथील टीएमसी केंद्रांत २०२७ पर्यंत तीन नव्या इमारती उभारण्यासाठी १२०० कोटी रुपयांची बांधिलकी जाहीर करत आहोत. आरोग्यसेवांचा प्रसार करण्याची आमची बांधिलकी जपण्यासाठी या उपक्रमाअंतर्गत देशातील विविध भागांत सर्वसमावेशक कॅन्सर केयर सर्व्हिसेस उभारली जातील. त्यामुळे रुग्णांना आधुनिक व अद्ययावत थेरपीज मिळण्यास मदत होईल.

याप्रसंगी टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. आर ए बडवे म्हणाले, एसीटीआरईसी, नवी मुंबई येथील रेडिएशन थेरपी विभाग मोठ्या रुग्णसंख्येला वेळेत रेडिओथेरपी पुरवण्यात महत्त्वाचा वाटा उचलेल, शिवाय हे उपचार आधुनिक तंत्रासह दिले जातील. यशस्वी परिणामांसाठी हे दोन्ही घटक आवश्यक आहेत. बाल वय तसेच प्रौढांमधील रक्ताचा कर्करोग बरा होण्याची दाट शक्यता असते, मात्र त्यासाठी तीव्र थेरपीजची गरज असते. विशाखापट्टणम आणि मल्लनपुर येथील प्रस्तावित आयसीआयसीआय सेंटर्स लहान मुलांसाठी बनवण्यात येत आहेत.त्यामध्ये विविध प्रकारच्या उपचार पद्धती दिल्या जातील. ही सेंटर्स लवकरच प्रादेशिक केंद्र बनतील आणि या भागातील रुग्णांना बोन मॅरोचे प्रत्यारोपण आणि सेल्युलर थेरपीजसारख्या आधुनिक थेरपीज देतील.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांमध्ये प्रबोधन आवश्यक   – पालकमंत्री प्रकाश आबिटकर 

ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांमध्ये प्रबोधन आवश्यक   – पालकमंत्री प्रका…