Home शासकीय महानगरपालिका अग्निशमन विभागाची अग्निशमन, शोध व बचावाची प्रात्यक्षिके

महानगरपालिका अग्निशमन विभागाची अग्निशमन, शोध व बचावाची प्रात्यक्षिके

24 second read
0
0
32

no images were found

महानगरपालिका अग्निशमन विभागाची अग्निशमन, शोध व बचावाची प्रात्यक्षिके

कोल्हापूर  : संभाव्य पूरपरिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज झाली असून बुधवारी पावसाळ्यापुर्वी अग्निशमन विभागाकडुन अग्निशमन, शोध व बचाव कार्याची प्रात्याक्षिके पंचगंगा नदी घाट येथे सादर झाली. या प्रात्याक्षिकामध्ये अग्निशमन विभागाकडील आत्यधुनिक साधन सामुग्रींचे प्रत्याक्षिक प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या समोर केले.

            यावेळी प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी पुराच्या काळात आपत्ती येणार हे गृहित धरून महापालिका प्रशासन उपायोजना आणि नियोजन करते. पावसाळयापुर्वी शहरातील नाले सफाई, धोकादायक झाडे छाटणे, धोकादायक इमारतीवर कारवाई सुरु आहे. आपत्ती काळात महापालिकेच्या यंत्रणेसोबत महाराष्ट्र सोल्जर फोर्स, कोणतेही आपत्ती आली तर त्याला सामना करण्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे सांगितले.

            नदीमध्ये प्रात्यक्षिक दरम्यान अग्निशमन विभागाकडे असलेल्या रबरी बोटीद्वारे एखादा व्यक्ती पाण्यात बुडल्यानंतर त्याला पाण्यातुन लाईफ जॉकेट, फायबर इनर व दोरच्या सहाय्याने कसे वाचवले जाते याचेही लाईव्ह प्रत्याक्षिक दाखविण्यात आले. त्याचप्रमाणे अग्निशमन विभागकडील कटर, स्प्रेडर, स्लॉप कटर, बी.ए.सेट, हायड्रोलिक जॉक, हायड्रालिक कटर, कॉम्प्रेसर, लिफ्टींग बॅग, लाईफ लाईन लाँचर, व्हिक्टम लोकेशन कॅमेरा आणि थर्मल इमेजिंग कॅमेरा, क्विक रिस्पॉन्स व्हेईकलचेही प्रात्याक्षिक दाखवण्यात आले. यावेळी महाराष्ट्र सोल्जर फोर्स संस्थेकडील स्वंयसेवकांना अग्निशमन विभागाकडून आपत्ती कालीन कालवधीमध्ये बचाव कार्य करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

            या प्रात्याक्षिकावेळी प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे, उप-आयुक्त रविकांत आडसूळ, सहा.आयुक्त डॉ.विजय पाटील, मुख्य अग्निशमन अधिकारी तानाजी कवाळे, स्थानक अधिकारी मनीष रणभीसे, दस्तगीर मुल्ला, जयवंत खोत, ओंकार खेडकर, मधुकर जाधव, प्रमोद मोरे, संग्राम मोरे, प्रविण ब्रम्हदंडे, संग्राम पाटील, नितेश शिंगारे तसेच अग्निशमन विभागाकडील जवान, महाराष्ट्र सोल्जर फोर्स संस्थेकडील स्वंयसेवक उपस्थीत होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…