no images were found
‘महाराष्ट्राची संकल्पना’ या विषयावर राज्यस्तरीय ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या दूर शिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या राज्यशास्त्र विषयाअंतर्गत ‘महाराष्ट्राची संकल्पना आणि लघु संशोधन प्रबंध सुलभ लेखन पद्धती’ या विषयावर राज्यस्तरीय ऑनलाईन कार्यशाळेचे दि. 01जून ते 6 जून दरम्यान दुपारी तीन ते चार या वेळेत आयोजित केल्याची माहिती संचालक प्रा. डॉ.डी. के. मोरे यांनी दिली.
या व्याख्यानमालेमध्ये ज्येष्ठ विचारवंत डॉ.अशोक चौसाळकर, शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन.शिंदे, शारदाबाई पवार अध्यासन समन्वयक प्रा.डॉ. भारती पाटील, डॉ.शिवाजी मोटेगांवकर, उपकुलसचिव डॉ. संजय कुबल व डॉ.वैशाली पवार विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. तरी या राज्यस्तरीय ऑनलाईन कार्यशाळेचा लाभ विद्यार्थी व अभ्यागतानी गुगल मीट व वेबेक्स अँप द्वारे घ्यावा,असे आवाहन प्रा.डॉ.डी.के. मोरे यांनी केले.