Home मनोरंजन लोकप्रिय कलाकार मनीष खन्ना साकारणार ज्योतिषाची भूमिका

लोकप्रिय कलाकार मनीष खन्ना साकारणार ज्योतिषाची भूमिका

2 second read
0
0
29

no images were found

लोकप्रिय कलाकार मनीष खन्ना साकारणार ज्योतिषाची भूमिका

‘झी टीव्ही’वरील ‘मैत्री’ या मालिकेत मैत्री (श्रेणू पारिख) आणि नंदिनी (भाविका चौधरी) या दोन अगदी जीवश्चकंठश्च मैत्रिणींची कथा सादर करण्यात आली आहे. मैत्री आणि नंदिनी या दोघी बालपणापासूनच एकमेकींच्या घनिष्ठ मैत्रिणी असतात. आपली मैत्री कोणी कधीच तोडू शकणार नाही आणि आपण लग्नानंतरही एकमेकींच्या घनिष्ठ मैत्रिणी राहू, याची या दोघींना पक्की खात्री असते. पण नियतीच्या मनात काही वेगळेच असते. आता मालिकेच्या कथानकाचा काळ सहा वर्षांनी पुढे नेण्यात आल्यानंतर मालिकेतील नातेसंबंधांमध्ये आमूलाग्र बदल घडून आला आहे. विशेषत: मैत्री आणि नंदिनी यांच्या मैत्रीच्या नात्याने वेगळेच वळण घेतले आहे. हर्षच्या (समर्थ जुरेल) प्रवेशामुळे मैत्रीच्या स्टार्ट-अप व्यवसायात अनपेक्षितपणे हस्तक्षेप होत आहे.

अलीकडच्या भागांमध्ये प्रेक्षकांनी पाहिले की मतभेद असले, तरी प्रिन्सीचे (नंदिनीची चुलत बहीण) लग्न थांबविण्यासाठी मैत्री आणि हर्ष हे कसे एकत्र येतात. कारण प्रिन्सीचा भावी पती हा बदमाष असतो. मात्र आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना दिसेल की निव्वळ मैत्रीवर सूड उगविण्यासाठी आणि तिला हरविण्यासाठी नंदिनी त्यांचे हे प्रयत्न थोपवून धरेल. मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांमध्ये खूपच उत्कंठा निर्माण केली असून अलीकडेच मालिकेत मदनच्या (मनिष खन्ना) व्यक्तिरेखेच्या झालेल्या प्रवेशामुळे कथानकाला नवे वळण लागले आहे. मदन हे हर्षचे वडील असतात. ते स्वत: ज्योतिषी असतात. आपल्या मुलासाठीच ते पत्नी कामनासह (मलिका घई) बनारसवरून प्रयागराजमध्ये राहायला आले असतात. पण मदन हे कठोर स्वभावाचे आणि मुलाला टाकून बोलणारे असल्याने हर्षला आपले वडील आवडत नसतात.

मनीष खन्ना म्हणाला, “मैत्री ही खरंच एक छान मालिका आहे. तिच्या कथानकात आतापर्यंत अनेक कलाटण्या आल्या आहेत. मी यात मदनची व्यक्तिरेखा साकारीत असून मदन हा हर्षचा पिता असतो. माझ्या कारकीर्दीत मी पित्याच्या भूमिका अनेकदा केल्या आहेत. पण मी प्रथमच एका ज्योतिषाची भूमिका रंगविणार आहे. खरं सांगायचं, तर ज्योतिषाची भूमिका साकारणं ही सोपी गोष्ट नाही, कारण एका ज्योतिषाभोवती असलेलं वलय आणि त्याचं वागणं हे नेहमीच्या व्यक्तिरेखांपेक्षा खूप वेगळं असतं. या व्यक्तिरेखेच्या अंतरंगात प्रवेश करण्यासाठी मी काही संस्कृत श्लोक शिकलो. प्रेक्षक मला या नव्या भूमिकेत स्वीकारतील, अशी मी आशा करतो. काही दिवसांपूर्वी मी या भूमिकेसाठी चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. मालिकेच्या टीममधील प्रत्येक सदस्य स्वभावाने खूपच छान आणि अगत्यशील आहे. माझ्या व्यक्तिरेखेद्वारे मालिकेत भरपूर नाट्यमय प्रसंग येतील आणि त्याद्वारे मी प्रेक्षकांचं मनोरंजन करीन.”

या मालिकेत भूमिका मिळाल्यामुळे मनीष खूप उत्साहित झाला असला, तरी मैत्री आणि हर्ष यांच्या जीवनात मदत कोणते बदल घडवील, ते पाहणे उत्कंठावर्धक ठरेल.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…