no images were found
अल्कोहोल सेवनाचे आतड्यांच्या आरोग्यावर होणारे परिणाम : डॉ. अमोल
गेल्या काही वर्षांपासून आतड्यांशी संबंधित समस्यांचे प्रमाण खूपच वाढू लागले आहे विशेष करुन अशा लोकांमध्ये जे अल्कोहोलचे सेवन करतात त्यांच्या मध्ये हे प्रमाण अधिक आहे. पुण्यातील बाणेर येथील मणिपाल हॉस्पिटल, मध्ये कन्सल्टंट गॅस्ट्रोॲन्ट्रोलॉजी मध्ये कार्यरत असलेल्या डॉ. अमोल डहाळे यांच्या मते “ मानवाच्या पचनसंस्थेत पोट हा अवयव महत्त्वपूर्ण भुमिका बजावत असतो आणि ज्यावेळी पचनाशी समस्या पाहता तो शरीराचा पहिला भाग आहे. म्हणूनच यामध्ये विषारी घटक निर्माण होऊ शकतात. ज्यावेळी अल्कोहोल पचनसंस्थेत प्रवेश करते त्यावेळी ते तोंड, घसा आणि अन्ननलिके वरही परिणाम करत असते. त्याच बरोबर अल्कोहोल हे रक्तवाहिन्यापर्यत पोहोचते, त्यावेळी त्याचा घातक परिणाम हा यकृत आणि मोठ्या आतड्यांवरही होत असतो. त्याचबरोबर अल्कोहोलच्या सेवना मुळे पोटात ॲसिड्स बनण्याची प्रक्रिया ही विचलित होते परिणामी चांगले बॅक्टेरिया तयार करण्याची प्रक्रिया खुंटते. त्याच बरोबर एकाच वेळी अधिक प्रमाणात अल्कोहोल पोटात गेल्यास त्यामुळे संरक्षक पेशी नष्ट होतात कारण या मुळे तुमच्या पोटाचे रक्षण हे पाचक एन्झाईम्स पासून होत असते, यामुळे सूज येते आणि अधिक जळजळ होऊ लागते.”
अल्कोहोलच्या सेवनातील धोकादायक घटक
१. जठराला सूज येणे : (गॅस्ट्रायटिस)- अतिरिक्त प्रमाणात अल्कोहोलचे सेवन केल्यामुळे पोटातील आतल्या स्तराला इजा होते आणि त्यामुळे गॅस्ट्रायटिस होतो. या स्थितीची लक्षणे ही लगेच, सातत्याने आणि दीर्घकाळ टिकणारी असतात. यामुळे दीर्घकाळ टिकणारे दुखणे होऊ शकते आणि त्यामुळे पोटात अल्सर किंवा ट्युमर होऊ शकतो.
२. पोटाचा कॅन्सर : असे दिसून आले आहे की नियमितपणे अल्कोहोलचे सेवन करणार्या लोकांमध्ये पोटाचा कॅन्सर होण्याची शक्यता अधिक असते, कधीकधी यामुळे कोलोरेक्टल कॅन्सरही होऊ शकतो.
३. यकृत निकामी होणे : जरी यकृतामुळे शरीरात प्रवेश करत असलेल्या अधिकतर अल्कोहोलचे पचन होण्यास मदत होत असली तरीही यामुळे यकृताच्या पेशींवर अतिरिक्त तणाव पडू लागतो आणि यामुळे त्या मरु लागातत. यामुळे यकृतात जखमा होतात, त्यामुळे कालांतराने यकृत निकामी होते. अल्कोहोल मुळे यकृताची कार्यक्षमता कमी होऊन नवीन पेशींची निर्मिती थांबू लागते.
४. स्वादुपिंडाचे नुकसान : अल्कोहोलचे सेवन हे ॲक्युट पॅनक्रिएटायटिस (स्वादुपिंडाला सूज येणे) होण्याच्या दोन प्रमुख कारणांपैकी एक आहे. या स्थितीची लक्षणे ही अगदी अचानक सुरु होतात आणि त्यामुळे कायमस्वरुपी नुकसान होऊ शकते.
आपल्या आतड्यांना आरोग्यपूर्ण ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय सांगतांना डॉ. अमोल यांनी खालील दोन महत्त्वपूर्ण पध्दतींचा अवलंब करण्याची सुचना केली आहे :
- अल्कोहोलचे सेवन थांबवणे : कधीही अल्कोहोल सेवन न करणे इष्ट यामुळे तुमच्या अन्य महत्त्वपूर्ण अवयवांचे कार्य ही कार्यक्षमपणे सुरु राहते.
- नियमित तपासणी: तुमच्या कॉलेस्ट्रॉल, रक्तदाब आणि शर्करेच्या स्तराची नियमित तपासणी करणे ही आवश्यक आहे. त्याच बरोबर जर कोणत्याही व्यक्तीला वेळोवेळी गॅस्ट्रायटिस, नियमित जुलाबांचा त्रास जुलाब किंवा दुखणे असल्यास तसेच ते नियमित पणे अल्कोहोलचे सेवन करत असल्यास त्यांनी तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.