no images were found
वैभवशाली व अभिमानी ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा गडदुर्ग किल्ले पन्हाळा येथे शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने साजरा करणार.
*स्वराज्य* हा शब्द उच्चारण्याची प्राज्ञा नव्हती, त्या काळामध्ये यौवनी आक्रमणाला थोपवत महाराष्ट्रातील गडकोटांच्या साक्षीने आणी छत्रपती शिवशंभूना जिवापाड जपणाऱ्या मावळ्यांची फौज निर्माण करत राजा शिवछत्रपतींनी मराठ्यांचे साम्राज्य उभा केले.
या गौरवशाली साम्राज्याला यथोचित सन्मान देत असताना हिंदू जनमनाला अभिमान असणारा त्याचबरोबर भारताच्या यौवनी तख्ताला देखील हादरा देणारा शिवराज्याभिषेक सोहळा ६ जुन १६७४ रोजी किल्ले रायगड येथे होऊन आमचे राजे शिवाजी हे सुवर्ण सिंहासनाधीश्वर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज झाले. या गौरवशाली इतिहासाला या चालू वर्षी साडेतीनशे वर्षे पूर्ण होत आहेत. गडकोटांच्या साक्षीने सह्याद्रीच्या रांगांना , शूरवीरांच्या शौर्याचे आणी छत्रपतींचे कर्तुत्व दातृत्व समाजासमोर आणत छत्रपतींच्या या ऐतिहासिक सोहळा म्हणजेच शिवराज्याभिषेक दिन हा सण महाराष्ट्राच नव्हे तर भारतातील स्वाभिमानी शिवछत्रपतींचा अठरापगड जातीचा मावळा आपल्या अंगावरची झूल बाजूला ठेवून राष्ट्रीय सण म्हणून अत्यंत अभिमानाने साजरा करतो*..
अर्थात हाच हिंदुत्वाचा वसा आणि वारसा सांगत माननीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने व पक्षप्रमुख उद्धवजींच्या कुशल नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या शिवसेनेने तर शिवछत्रपतींना आपला श्वास मानून समाजकारण केले आहे.
छत्रपतींचे विचार आणि भगव्याचा वारसा जोपासत हिंदुत्वाची पताका महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सतत फडकवत ठेवणाऱ्या आपल्या शिवसेनेच्या वतीने हा ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा ६ जुन रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या व छत्रपती शंभूराजांच्य परमपवित्र स्पर्शाने पुनीत झालेल्या व महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाच्या रोमांचकारी आठवणींचा साक्षीदार असणाऱ्या कोल्हापुरातील गडदुर्ग पन्हाळा किल्ल्यावर साजरा करण्याचे आयोजित केले आहे. यावेळी पन्हाळा येथील शिवमंदिरात असणाऱ्या शिवछत्रपतींच्या मुर्तीला
दक्षिणप्रदेशातील बेंगलोर फोर्ट, किल्ले साजरा-गोजरा, वेल्लूर, जिंजी व तंजावर तसेच महाराष्ट्रातील किल्ले राजगड, सिंधुदुर्ग, सर्जाकोट व राजकोट या विविध किल्ल्यांवरून आणलेल्या पवित्र पाण्याने जलाभिषेक व दुग्धाभिषेक करून पालखी सोहळा त्याचबरोबर मर्दानी खेळ, गडपूजन, गोंधळ व पोवाडे अशा वीरश्रीन भारलेल्या व हजारो शिवसैनिकांच्या साक्षीने व अनेक शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये साजरा होणारा असुन हा शिवराज्याभिषेक दिन कोल्हापूरच्या इतिहासामध्ये अत्यंत सुवर्णाक्षरी पान ठरेल.शिवछत्रपती या अक्षराशी आपलं इमान जपत राहणारा शिवसैनिक व कोल्हापुरातील स्वाभिमानी जनतेने या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी ५ व ६ जुन रोजी आयोजित केलेल्या गौरवशाली व अभिमानास्पद राजा शिवछत्रपतींच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला उपस्थिती लावून हा सोहळा वैभवशालीरीत्या संपन्न करूया.