
no images were found
राज्यात भ्रष्टाचार वाढला… दंगली वाढतील असं दबक्या आवाजात बोललं जात आहे!
दोन हजार रुपयांच्या नोटबंदीचा निर्णय घेतला तीन महिन्यात या नोटा बंद होणाऱ्या लोकांना फार त्रास होईल असं वाटत नाही, असं मत महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते आमदार अजित पवार यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं अनेक महिने दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद झाली होती याबद्दल अधिक अधिकारवाणीनं केवळ आरबीआय सांगू शकेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
जागा वाटपा संदर्भात जे दावे केली जात आहेत त्यामध्ये काहीही तथ्य नसल्याचं स्पष्ट करून अजित पवार म्हणाले अजूनही तिन्ही पक्षातील दोन दोन व्यक्ती येऊन चर्चा करणार आहेत. ती चर्चा झालेली नाही. जागा वाटपा संदर्भात वरिष्ठ पातळीवर अंतिम निर्णय होईल. त्यावेळी सर्वांना अधिकृत माहिती दिली जाईल.
भाजपात अनेक नेते जाणार असल्याचे दावे करण्यात येत आहेत. मात्र असे दावे अनेक वर्षं करण्यात येत आहेत. ज्या वेळेस हे दावे खरे ठरतील त्यावेळेस या दाव्यांचं महत्त्व ठरेल, असं सांगून अजित पवार म्हणाले महागाई , बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न यांच्यावर दुर्लक्ष करण्यासाठी असे दावे केले जात आहेत. अशा पद्धतीनं बातम्या देऊन ते नेमकं काय साध्य करतात हे अजून पर्यंत कळलेलं नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
अशा बातम्यांमुळे पेट्रोल दरवाढ कमी होणार आहे का सिलेंडरच्या किमती कमी होणार आहेत का तरुणांना रोजगार मिळणार आहेत का, असा सवाल अजित पवार यांनी पत्रकारांशी बोटांना केला
ज्यांच्या हातात सरकार असतं त्यांनी प्रशासनावर एक जरब बसवली पाहिजे.
पोलीस खातं ज्यांच्याकडे आहे त्या देवेंद्र फडणवीस यांनी त्या पोलीस खात्यात आदर युक्त दबदबा निर्माण केला पाहिजे.
गुन्हेगारांवर कारवाई करणाऱ्या अधिकारी वर्गाला प्रोत्साहन दिलं तरच बलात्कारांसारख्या गोष्टी थांबू शकतात गुन्हेगारी थांबू शकते, असं मत हे अजित पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं.
दंगली वाढतील असं दबक्या आवाजात बोललं जात आहे.
कोणत्याही जाती, धर्म आणि पंथामध्ये दुसऱ्याचा द्वेष आणि अनादर करावा असं कृत्य करू नये, असा सल्ला त्यांनी दिला.
ज्यांची चौकशी चालू आहे त्यांनी ईडीला किंवा त्या यंत्रणाला सहकार्य केलं पाहिजे आणि सरकारी यंत्रणेनं सुद्धा द्वेष भावनेनं, सूड भावनेनं, राजकीय भावनेनं त्या यंत्रणाचा वापर करू नये, असंही अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.
सरकारकडून ज्या ज्या घोषणा केल्या जात आहेत त्यांच्याकडून अंमलबजावणी होत नाही.विकास कामाला स्थगिती दिली जाते.
करोडो रुपयांची बिलं ट्रेझरी मध्ये थांबून ठेवलेली आहे.
शेतकऱ्यांच्या घरापर्यंत दारापर्यंत कुठलीही मदत पोहोचलेली नाही सरकारनं जाहीर केलेल्या गोष्टींची अंमलबजावणी केलेली नाही. सरकार विरोधात तोच असंतोष जनतेच्या मनामध्ये आहे,अशी टीका अजित पवार यांनी यावेळी केली.
हे सरकार असंवैधानिक आहे असं अनेकदा बोलून झालेलं आहे. ज्यावेळेस आम्हाला हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट सांगेल की या सरकारला कोणताही अधिकार नाही त्यावेळीच हे खरं मानावे लागेल. शेवटी जनतेच्या दारात जेव्हा हे सरकार जाईल आणि जनता जो निर्णय देईल त्याचवेळी हे सरकार संवैधानिक आहे का हे सिद्ध होईल,