
no images were found
कोळेकर तिकटी ते पाण्याचा खजिना रस्ता वाहतूकीस 10 दिवस बंद
कोल्हापूर : केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजनेअंतर्गत शहरातील कोळेकर तिकटी ते पाण्याचा खजिना या रस्त्याच्या दोन्ही बाजूने पिण्याच्या पाण्याची नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम रविवार, दि. 21 मे 2023 पासून सुरू करण्यात येणार आहे. हे काम साधारणत: 8 ते 10 दिवस सुरू राहणार आहे. या रस्त्यावर दोन्ही बाजूने पाईपलाईन टाकावी लागणार असल्याने या कामासाठी हा रस्ता पुर्णत: बंद करण्यात येणार आहे. तरी या रस्त्यावरील दैनंदिन वाहतूक शहर वाहतूक शाखेच्या मार्गदर्शना खाली खबरदारीचा उपाय म्हणून वळविण्यात आली आहे. संभाजीनगरकडून मिरजकर तिकटीकडे येणारी वाहतूक नंगीवली चौका कडून लाड चौक ते महाद्वार रोड या मार्गाने तसेच वारे वसाहत, महादेव मंदीर, पद्मावती चौक ते मंगेशकर नगर मार्गे गोखले कॉलेज चौक व मिरजकर तिकटीकडून संभाजीनगरकडे जाणारी वाहतूक मिरजकर तिकटी ते खरी कॉर्नर ते लाड चौक ते पाण्याचा खजिना आणि मिरजकर तिकटी ते केशवराव भोसले नाट्यगृह ते रावणेश्वर मंदिर ते गोखले कॉलेज चौक या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. तरी सर्व नागरीकांनी वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात येत आहे.