no images were found
सीपीआर स्वच्छता कर्मचाऱ्यांनी मानले राज्य शासनाचे आभार
कोल्हापूर/प्रतिनिधी : छत्रपती प्रमिला राजे शासकीय रुग्णालय व राजश्री शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयामध्ये काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सीपीआर व वैद्यकीय महाविद्यालय कंत्राटी स्वच्छता कर्मचारी सेनेच्या वतीने आज सीपीआर मध्ये पेढे वाटप करून आनंदउत्सव साजरा करण्यात आला. राज्य शासनाने नविन नियमानुसार डी.एम. कंपनीला एक वर्षासाठी दिलेल्या ठेक्याचा आनंद साजरा करत कर्मचार्यांनी राज्यशासनाचे आभार मानले.
राज्य शासनाने २०१७ मध्ये राबवलेली निविदा प्रक्रिया आज अखेर सुरू होती. त्यामुळे राज्य शासनाकडून २०१७ मधील दरानुसारच स्वच्छता पुरवठा करणाऱ्या कंपनीला मोबदला मिळत होता. स्वच्छता कामाची निविदा नव्याने राबवावी अशी मागणी डी.एम कंपनीसह स्वच्छता कर्मचारी गेल्या चार वर्षापासून करत होते. मागिल वर्षी सीपीआर मधील निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून डीएम इंटरप्राईजेस कंपनीला राज्य शासनाने नव्या दरासह निविदा मंजूर केली आहे. त्यामुळे यापुढील काळात कर्मचाऱ्यांना चालू दराप्रमाणे सर्व मोबदला मिळणार असल्याने सीपीआर मधील सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने सीपीआर डीन ऑफिसच्या समोर आज हा आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी शासनाचा, कामगार एकजुटीचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी आम्ही डी.एम कंपनीच्या पाठीशी सर्व सफाई कर्मचारी राहणार असल्याची प्रतिक्रिया कामगार प्रतिनिधी अनिल माने यांनी दिली आहे.या सीपीआर मधील सफाई कर्मचाऱ्यांना चांगल्या पद्धतीने डी.एम कंपनीकडून सहकार्य मिळत असते.चांगला पगार दिला जातो. मात्र आता या कंपनीला ठेका मिळू नये यासाठी काहींंनी कंपनीच्या बदनामीचे षडयंत्र सुरू केले होते. कामगारांना न्याय मिळवून देण्याच्या नावाखाली स्वतःचा स्वार्थ साधू पाहणाऱ्यांना चपराक बसली असल्याची प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांनी बोलून दाखवली. यापुढील काळात डीएम कंपनीच्या पाठीशी आम्ही ठाम राहणार असून कंपनीला व कर्मचाऱ्यांना नाहक त्रास देणाऱ्यांना त्यांच्याच भाषेत जाब विचारू असा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
सीपीआर मधील सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत साखर पेढे वाटत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आनंद उत्सव साजरा करताना विजयाच्या घोषणा देण्यात आल्या.यावेळी सफाई कामगार अनिल माने, अरुण कांबळे, राहुल धनवडे, मनीषा चव्हाण,लता माळगे, विमल कांबळे, सुनीता फुटाणे, सुजित सावंत,राहुल वायदंडे, कुमार कांबळे, रोहन कांबळे, रोहित सावंत, चेतन कट्टी, नीता चव्हाण, दिपाली डाकवे, पद्मा मुदाळे गोपीनाथ कांबळे,अरुण कांबळे,शंकर कांबळे,पद्मा मुसाळे,रोहिणी कांबळे,नग्मा मकानदार,मनिषा पोवार, वत्सला शिंदे,उमा मेस्त्री,सविता पोवार आदी सह महिला सफाई कर्मचारी उपस्थित होत्या.