Home शासकीय पुन्हा नोटबंदी! 2000 हजारांची नोट बदलता येणार, जाणून घ्या नेमके नियम काय?

पुन्हा नोटबंदी! 2000 हजारांची नोट बदलता येणार, जाणून घ्या नेमके नियम काय?

4 second read
0
0
38

no images were found

पुन्हा नोटबंदी! 2000 हजारांची नोट बदलता येणार, जाणून घ्या नेमके नियम काय?

आरबीआयने 2 हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, या नियमांनुसार एकावेळी नेमके किती रुपये बदलून मिळू शकतात, याबाबतची माहिती देखील जारी करण्यात आली आहे.

 नवी दिल्ली: आरबीआयने 2 हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे तुमच्याकडे 2 हजार रुपयांच्या नोटा असतील तर त्या तुम्हाला बँकेत जाऊन बदलाव्या  लागणार आहेत. आरबीआयने परिपत्रक काढून 2 हजार रुपयांच्या नोटा बंद करत असल्याचा निर्णय घेतला आहे.जुन्या 500 आणि 1 हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर नोटांची तूट होऊ नये म्हणून 2 हजार रुपयांच्या नोटा चलनात आणल्या गेल्या होत्या. दुसऱ्या नोटा बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्यानंतर 2 हजार रुपयांच्या नोटांचं उद्दीष्ट संपलं होतं, त्यामुळे 2018-19 सालीच 2 हजारांच्या नोटांची छपाई बंद झाली होती.

आरबीआयच्या परिपत्रकानुसार 2 हजार रुपयांच्या नोटा तुमच्या बँकेत जाऊन जमा करता येतील  किंवा या नोटांच्या बदल्यात दुसऱ्या नोटाही घेता येतील. यासाठी रिझर्व्ह बँकेकडून कालावधी जाहीर करण्यात आला आहे. सर्वसामान्य नागरिक 23 मे ते 30 सप्टेंबर या कालावधीत त्यांचं ज्या बँकेत अकाउंट आहे त्या बँकेत जावून नोट बदलू शकतात किंवा बँकेत जमा करु शकतात.

 2 हजाराच्या नोटा जमा करण्यासाठी काही मर्यादा देखील आखून देण्यात आल्या आहेत. प्रत्येकजण एकावेळी फक्त 10 नोटा म्हणजेच 20 हजार रुपयांपर्यंतच्या नोटा बदलून घेऊ शकतो. विशेष म्हणजे तुम्ही कोणत्याही बँकेच्या शाखेतून नोटा बदलून घेऊ शकता.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

 ‘पुष्पा इम्पॉसिबल’ मध्ये पुष्पाचा कायद्याचा अभ्यास करण्याचा निर्धार

 ‘पुष्पा इम्पॉसिबल’ मध्ये पुष्पाचा कायद्याचा अभ्यास करण्याचा निर्धार पुष्पाच्या हृदयस…