
no images were found
त्र्यंबकेश्वर मंदिरातील ‘त्या’ घटनेची एसआयटी चौकशी होणार :- उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस
त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करण्यासाठी एक विशिष्ट जमाव मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एकत्र झाल्याच्या कथित घटनेसंदर्भात एफआयआर नोंदवून अत्यंत कडक कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
त्र्यंबकेश्वर मंदिरातील कथित घटनेसंदर्भात एफआयआर नोंदवून अत्यंत कडक कारवाई करण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यामुळं आता या प्रकरणातील दोषी आरोपींवर मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राज्यातील हिंसाचारांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरात पोलिसांकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिरातील घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले. ही एसआयटी केवळ यावर्षीच्या घटनेची चौकशी करणार नाही, तर गेल्यावर्षीच्या घटनेचीही चौकशी करेल, ज्यावेळी जमाव त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये शिरल्याची कथित घटना घडली होती. त्यानंतर आता नाशिक पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करत कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे लक्ष घालून असल्याची माहिती आहे.गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये हिंसाचार होत असल्याच्या घटना समोर येत आहे.
त्यानंतर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप हे त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तळ ठोकून आहेत.