no images were found
आयटी एक्स्पो मध्ये अभियंता शाखेच्या विद्यार्थ्यांसाठीचा कार्यक्रम संपन्न
कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी सांगता व कृतज्ञता पर्व अंतर्गत आय टी असोसिएशन ऑफ कोल्हापूर तर्फे छत्रपती शाहू मिल येथे कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यातील विविध इंजिनिअरींग कॉलेज, मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट यातील ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफीसर्स तसेच आयटी व इतर कंपन्यांतील एच आर मॅनेजर्स व संचालक यांच्यासाठी टीपीओ कन्व्हेन्शन हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामध्ये आयटी
कंपन्यांच्या अभियांत्रिकी महाविद्यालयांकडून असलेल्या अपेक्षा मांडण्यात आल्या. विद्यार्थ्यांना आय टी क्षेत्रातील रोजगाराच्या संधी, कौशल्य विकास कार्यक्रम तसेच नवीन शैक्षाणिक धोरण, अभ्यासक्रमातील सुधारणांच्या अपेक्षा यावर उपस्थित मान्यवरांनी आपली मते मांडली. शिवाजी विद्यापीठ संलग्न महाविद्यालये व परिसरातील सर्व शैक्षणिक संस्था तसेच आयटी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने एक कृतिमंच स्थापन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास शिवाजी विद्यापीठाचे डॉ. जी एस राशिनकर, अध्यक्ष प्रताप पाटील, उपाध्यक्ष स्नेहल बियाणी, सचिव रणजीत नार्वेकर, खजिनदार राहुल मेंच आणि संचालक मंडळ उपस्थित होते.