no images were found
केंद्राच्या पीएम श्री योजनेत महापालिकेच्या महात्मा फुले विद्यालयाचा समावेश
कोल्हापूर : राज्यातील ५१६ शाळांचा सर्वांगीण विकास करणाऱ्या पीएम श्री योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. देशभरात पहिल्या टप्प्यात १५ हजाराहून अधिक शाळा उच्च दर्जाचे गुणात्मक शिक्षण देणाऱ्या सर्वोत्कृष्ट शाळा म्हणून विकसित करण्यात येणार असून यात राज्यातील ८४६ शाळांचा समावेश करण्यात येणार आहे. यामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या फुलेवाडी येथील महात्मा फुले विद्यालयाचा समावेश करण्यात आला असून, याकरिता राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी पाठपुरावा केला. याबद्दल महात्मा फुले विद्यालयातील शिक्षकांच्या वतीने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांची भेट घेवून जाहीर आभार मानले.
याबाबत माहिती देताना श्री.राजेश क्षीरसागर यांनी, केंद्र शासनाकडून पीएम- स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया (Shri) योजना अंमलात आणली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना देशातील सुमारे १४,५०० हून आधी शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे आणि सर्व स्तरांवर परिवर्तनाचा उद्देश ठेवून हि योजना राबविण्यात येणार आहे. याबाबत मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली आणि यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील १७ शाळांचा समावेश करण्यात आला आहे. मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब आणि शालेय शिक्षण मंत्री ना.मा.श्री.दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक स्थरावर समिती स्थापन होवून या शाळांचा विकास करण्यात येणार आहे. प्रत्येक शाळेसाठी १ कोटी ८८ लाख एवढी तरतूद ५ वर्षांसाठी करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
एकीकडे ठराविक खासगी शिक्षण संस्थाकडून पालकांची होणारी आर्थिक लुबाडणूक पाहता जिल्हा परिषद, महानगरपालिका शाळांचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला जात आहे. सर्वसामान्य, गोरगरीब, कष्टकरी पालकांच्या पाल्यांना मोफत आणि दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करून आगामी काळात महानगरपालिका शाळांना उर्जितावस्था देण्याकरिता पाठपुरावा करू, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी श्री.नामदेव लवटे, मनपा महात्मा फुले विद्यालयाचे कुलदीप जठार, संतोष आंबेकर, आनंदा पाटील, तुषार भापकर आदी उपस्थित होते.