no images were found
प्रॉक्टर अॅण्ड गॅम्बल इंडियाकडून ४थ्या वार्षिक ‘वी सी इक्वल’ समिटमध्ये नवीन कटिबद्धतांची घोषणा
मुंबई : विक्स, एरियल, जिलेट, पॅम्पर्स इत्यादींसारख्या ब्रॅण्ड्सची निर्माती कंपनी प्रॉक्टर अॅण्ड गॅम्बल इंडिया (पीअॅण्डजी इंडिया) ने आज त्यांचे चौथे वार्षिक वी सी इक्वल इक्वॉलिटी अॅण्ड इन्क्लुजन समिट २०२३ मध्ये देशभरात इक्वॉलिटी अॅण्ड इन्क्लुजनला (ईअॅण्डआय) (समानता व सर्वसमावेशकता) चालना देण्याचा मनसुबा असलेल्या नवीन कटिबद्धतांची घोषणा केली. या इव्हेण्टमध्ये प्रतिष्ठित समर्थक व व्यक्तिमत्त्वांनी समाजाला समानता व सर्वसमावेशकतेसंदर्भात सामना करावी लागणारी आव्हाने आणि विविध भागधारक लैंगिक सक्षमीकरण, तसेच जाहिराती व मीडियामध्ये सर्वसमावेशकतेचा समावेश अशा मुद्दयांवर कशाप्रकारे उन्नती करू शकतात याबाबत चर्चा केली.
‘युनिक व युनाइटेड’ या थीमवर निर्माण करण्यात आलेले हे वी सी इक्वल समिट ‘आपली शक्ती आपल्या वेगळेपणात आहे, आपली ताकद आपल्या एकजुटीत आहे’ या विचारावर आधारित होते.
समिटमध्ये पीअॅण्डजी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी एलव्ही वैद्यनाथन यांनी विद्यमान संवादाला आव्हान करण्यासाठी नवीन कटिबद्धतांची आणि प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या कृतींप्रती कटिबद्धतेची घोषणा केली, तसेच गतकाळात केलेल्या कटिबद्धतांमधील अपडेट्सबाबत सांगितले: