
no images were found
शौर्य,अर्णव,सांची व थिया यांची कोल्हापूर जिल्हा संघात निवड
कोल्हापूर :- छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम मधील जिल्हा संघटनेच्या हॉलमध्ये चेस असोसिएशन कोल्हापूरच्या वतीने घेण्यात आलेल्या नऊ वर्षाखालील मुला मुलींच्या कोल्हापूर जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा संपन्न झाल्या. मुलांच्या गटात स्विस लीग पद्धतीने एकूण सहा फेऱ्यात स्पर्धा झाली.अंतिम सहाव्या फेरीनंतर द्वितीय मानांकित इचलकरंजीचा शौर्य बगाडिया ने सहापैकी सहा गुण करून अजिंक्यपद पटकाविले.तृतीय मानांकित कोल्हापूरचा अर्णव पाटील ने पाच गुणांसह उपविजेतेपद मिळविले तर अग्रमानांकित मानांकित इचलकरंजीच्या विवान सोनीला साडेचार गुणासह तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले.वेदांत कुलकर्णी कोल्हापूर व वेदांत बांगड इचलकरंजी यांचा अनुक्रमे चौथा व पाचवा क्रमांक आला.मुलींच्या गटातील स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने घेण्यात आली.इचलकरंजीच्या सांची चौधरी व थिया शहा या दोघींचे समान पाच गुण झाल्यामुळे आपापसातील सामन्याच्या निकालानुसार सांचीला अजिंक्यपद मिळाले तर थियाला उपविजेतेपदावर संतुष्ट व्हावे लागले.कोल्हापूरच्या राजेश्वरी मुळेने चार गुणासह तृतीय स्थान पटकाविले.
नागपूर येथे 5 ते 7 मे दरम्यान होणाऱ्या महाराष्ट्र राज्य नऊ वर्षाखालील मुला मुलींच्या निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्ह्यांचा मुलामुलींचा निवड झालेला संघ पुढीलप्रमाणे
मुले – 1) शौर्य बगाडिया इचलकरंजी 2)अर्णव पाटील कोल्हापूर
मुली – 1) सांची चौधरी इचलकरंजी 2) थिया शहा इचलकरंजी
निवड झालेल्या प्रत्येक खेळाडूस रोख बक्षीसा व्यतिरिक्त दोन टी-शर्ट व स्पर्धा खेळून आल्यावर प्रत्येकी एक हजार रुपये संघटनेच्या मार्फत दिले जाते.