Home सामाजिक न्यू पॉलिटेक्निक आणि केडीसीए यांच्यामध्ये सामंजस्य करार

न्यू पॉलिटेक्निक आणि केडीसीए यांच्यामध्ये सामंजस्य करार

0 second read
0
0
63

no images were found

 

न्यू पॉलिटेक्निक आणि केडीसीए यांच्यामध्ये सामंजस्य करार

कोल्हापूर(प्रतिनिधी) :श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील न्यू पॉलिटेक्निक आणि कोल्हापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन (केडीसीए) यांच्यामध्ये सामंजस्य करार पार पडला. या करारानुसार केडीसीएकडून न्यू पॉलिटेक्निकच्या मैदानावरील क्रिकेटची विकेट व संपूर्ण मैदान यांचा तंत्रशुद्ध पद्धतीने विकास केला जाणार आहे. त्याचबरोबर मैदानावर क्रिकेट खेळासाठी आवश्यक अशा सर्व सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. मैदानाच्या देखभालीसाठी केडीसीएकडून तज्ञ क्यूरेटर व इतर स्टाफ नियुक्त केले जाणार आहेत. क्रिकेट मैदान पूर्ण तयार झाल्यावर केडीसीएचे व्यावसायिक क्रिकेट सामने इथे भरवले जातील. त्याचबरोबर, नवोदित क्रिकेटपटूंसाठी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण उपलब्ध केले जाणार आहे.
या कराराचा कालावधी दहा वर्षांचा असून करारावर ‘प्रिन्स शिवाजी’चे चेअरमन के. जी. पाटील, केडीसीएचे अध्यक्ष चेतन चौगले, जनरल सेक्रेटरी केदार गयावाळ आणि न्यू पॉलिटेक्निकचे प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे यांनी सह्या केल्या. यावेळी केडीसीएचे माजी अध्यक्ष बाळ पाटणकर उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…