Home सामाजिक राधानगरी ते दाजीपूर रस्ता वाहतुकीसाठी सुरु

राधानगरी ते दाजीपूर रस्ता वाहतुकीसाठी सुरु

5 second read
0
0
65

no images were found

राधानगरी ते दाजीपूर रस्ता वाहतुकीसाठी सुरु

  कोल्हापूर  : राधानगरी ते दाजीपूर या लांबीपैकी पठाणनाला ते राधानगरी या लांबीतील डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने अधिसुचना रद्द करुन दाजीपूर ते राधानगरी रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीस पुर्वीप्रमाणे सुरु करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.

राधानगरी ते दाजीपूर या लांबीपैकी पठाणनाला (किमी 79/400) ते राधानगरी या लांबीतील डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तथापि, दाजीपुर ते पठाणनाला या लांबीतील काम करत असताना वन विभागाकडून हरकत घेऊन या लांबीतील काम बंद करण्यात आले आहे. या विभागाकडून वनविभागाकडे परवानगी बाबत पाठपुरावा सुरु असून वनविभागाकडून परवानगी प्राप्त होताच पुनश्च रस्ता बंद करण्याबाबत परवानगी घेण्यात येत आहे. राधानगरी, दाजीपुर ते फोंडा या मार्गातील बंद करण्यात आलेली वाहतुक पुर्ववत करण्यात येत असल्याची  माहिती अपर जिल्हादंडाधिकारी भगवान कांबळे यांनी दिली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…