no images were found
“मी हॅरी पॉटरची फार मोठी चाहती आहे,कीर्ती नागपुरे
गतवर्षी प्रसारणास प्रारंभ झाल्यापासूनच ‘झी टीव्ही’वरील ‘प्यार का पहला नाम राधा मोहन’ ही मालिका प्रेक्षकांची अतिशय आवडती मालिका बनली आहे. आजच्या काळातील वृंदावनमध्ये घडणारी ही एक प्रेमकथा आहे. मालिकेचे कथानक मन गुंतवून ठेवणारे असून त्याला मिळणार््या कलाटण्या आणि मोहन (शब्बीर अहलुवालिया), राधा (निहारिका रॉय) दामिनी (संभाबना मोहन्ती) आणि तुलसी (कीर्ती नागपुरे) यासारख्या सहज भावणार््या व्यक्तिरेखांमुळे प्रेक्षकांमध्ये मालिकेची उत्सुकता कायम राहिली आहे.
प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सर्व कलाकार रात्रंदिन काम करीत आहेत. कीर्ती नागपुरे आपल्या चित्रीकरणाच्या वेळापत्रकात बुडाली असली, तरी दररोज ती त्यातून थोडा वेळ बाजूला काढून आपले आवडते पुस्तक वाचते, असे दिसते. चित्रीकरणाच्या प्रदीर्घ वेळापत्रकामुळे आपल्या छंदांसाठी वेगळा वेळ काढणे कलाकारांना जमत नाही. पण आपली वाचनाची आवड पूर्ण करण्यासाठी कीर्ती नागपुरे थोडा वेळ निश्चितच काढू शकते. तिला वाचनाचे वेडच असून तिला जरासा जरी मोकळा वेळ मिळाला, तरी ती हातात पुस्तक घेऊन ते वाचत बसते.
कीर्ती नागपुरे म्हणाली, “लहान असल्यापासूनच मला पुस्तक वाचनाची आवड निर्माण झाली. मला पौराणिक कथा आणि काल्पनिक कादंबर््या वाचायला आवडतात. तसंच सत्यघटनेवर आधारितत पुस्तकं वाचायलाही आवडतात. आवडतं पुस्तक वाचलं की माझ्या मनावरचा ताण दूर होतो आणि माझं मन आनंदी होतं. कधी कधी तर दोन प्रसंगांच्या चित्रीकरणाच्या मधल्या थोड्या वेळेतही मी पुस्तकाची काही पानं वाचते. मला सांगावसं वाटतं की बर््याच जणांना ही गोष्ट ठाऊक नसेल, पण मी हॅरी पॉटरची फार मोठी चाहती आहे. हॅरी पॉटर आणि गेम ऑफ थ्रोन्स मालिकेतील सर्व पुस्तकं मी वाचून काढली आहेत. पुस्तक वाचनाची ही आवड मला माझ्या पालकांकडून मिळाली आहे. लहानपणी मी काहीही मिळवलं की मला पुस्तकच बक्षीस म्हमून मिळत असे. परिणामी मला अनेक गोष्टींची माहिती तर झालीच, पण माझ्याकडे पुस्तकांचा मोठा संग्रहही झाला.”
ती पुढे म्हणाली, “सध्या मी फ्योडोर दोस्तोवस्कीची ‘क्राइम अॅण्ड पनिशमेंट’ ही कादंबरी वाचत आहे. मला ती फार आवडते, पण चित्रीकरणाच्या वेळापत्रकामुळे मला वाचायला फार वेळच मिळत नाही. तरीही मी थोडा वेळ काढून त्यातील एखादा चॅप्टर वाचते. प्रत्येकाने एका महिन्यात एक तरी कादंबरी वाचली पाहिजे, असं मला वाटतं. वाचनामुळे तुमच्या माहितीत तर भर पडतेच, पण तुमची भाषाही सुधारते. वाचनामुळे तुम्हाला जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन लाभतो.”
पुस्तक वाचनात कीर्ती जरी आपला वेळ सत्कारणी लावत असली, तरी ‘प्यार का पहला नाम राधा मोहन’च्या अलीकडील भागांमध्ये प्रेक्षकांनी पाहिले की दामिनी आणि कादंबरी (स्वाती शाह) यांच्याबरोबर राधा कशी ऑफिसला जाऊ लागली आहे ते. तुलसीच्या मृत्यूमागील खरे कारण शोधणे हा तिचा हेतू आहे. पण तिच्या आयुष्यात नवे प्रश्न निर्माण करून दामिनी तिला छळत असते. दामिनीच्या कुटिल हेतूंपासून राधाला वाचविण्याचा प्रयत्न तुलसी करते. त्यामुळे तुलसीच्या मृत्यूचे खरे कारण शोधून काढण्यात राधाला यश येते की नाही, ते पाहणे उत्कंठावर्धक ठरेल.