no images were found
घरफाळा विभागाची सन 2023-24 या आर्थिक वर्षातील बीले ऑनलाईन प्रसिध्द
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या कर आकारणी व वसूली विभागाच्यावतीने सन 2023-24 या आर्थिक वर्षातील मालमत्ता कराची बीले ऑनलाईन सिस्टीमवर जनरेट करुन प्रसिध्द करण्यात आलेली आहेत. सन 2023-24 या चालू आर्थिक वर्षातील घरफाळा कर एकरकमी भरल्यास चालू वर्षाचे मिळकत कर (Municipal Tax) मध्ये दि.30 जून 2023 अखेर 6 टक्के सवलत देण्यात आलेली आहे. हि देयके नागरिकांना पोस्ट विभागामार्फत घरपोच पाठविण्याची कायर्वाही सुरू आहे. तरी नागरिकांनी पोस्टामार्फत देयके येण्याची वाट न पाहता मागील वर्षी भरणा केलेल्या रक्कमेची पावती, डिमांड बील, शहरातील महापलिकेच्या सर्व नागरी सुविधा केंद्रामध्ये भरणा करण्याची सोय उपलब्ध करण्यात आलेली आहे. हा भरणा सुटटीचे दिवस वगळून कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 9.00 ते सांयकाळी 4.00 वाजेपर्यत भरता येणार आहे. या व्यतिरिक्त महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर www.kolhapurcorporation.gov.in, गुगल-पे, फोन-पे, BHIM app, इ. युपीआय वॉलेटस या अॅपव्दारे देखील मिळकतधारकानां कर भरणा करता येणार आहे.