no images were found
टॅली सोल्युशन्सने जाहीर केली ‘एमएसएमई ऑनर्स‘ची तिसरी आवृत्ती
कोल्हापूर : सॉफ्टवेअर उत्पादने उद्योगातील अग्रणी टॅली सोल्यूशन्सने तीन दशकांहून अधिक काळ लघु आणि मध्यम व्यवसायांसाठी (SMBS) व्यवसाय व्यवस्थापन उपायसुविधा सादर करताना ‘एमएसएमई ऑनर्स’ च्या तिसऱ्या आवृत्तीची घोषणा केली. राष्ट्राच्या आर्थिक प्रगतीत योगदान दिलेल्या व्यवसाय आणि उद्योजकांना ओळखण्यासाठी हा वार्षिक उपक्रम आहे. एमएसएमईच्या तळागाळातील सर्वोत्कृष्ट कार्यपद्धतींद्वारे विविधतेची आणि सकारात्मक प्रभावाची ओळख या ऑनर्समुळे होईल आणि त्यांचा सन्मान होईल. यामुळे छोट्या मोठ्या शहरांतील, विभागातील प्रभाव पाडणारे खरे घटक असलेल्या आणि अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या कित्येक अनामिक व्यक्तींचा उचित सन्मान होतोय याची खात्री होत ही सर्वसमावेशक ओळख बनत आहे.
२५० कोटी रुपयांपेक्षा कमी उलाढाल असलेले आणि वैध GSTIN असलेले सर्व व्यवसाय या प्रतिष्ठेच्या मान्यता सोहळ्यात सहभागी होऊ शकतात. इच्छुक उद्योजक किंवा अशा उद्योजकांना ओळखणारे लोक १० मे २०२३ पर्यंत https://tallysolutions.com/msme-honours द्वारे त्यांच्या प्रवेशिका सबमिट करू शकतात.
एमएसएमई ऑनर्सच्या दुसऱ्या सत्राला देशभरातील १,४८७ गावे आणि शहरांमधून सुमारे २,००० नामांकने प्राप्त झाली आणि २७ जून २०२२ रोजी आंतरराष्ट्रीय एमएसएमई दिनानिमित्त ९८ पेक्षा जास्त व्यवसायांना मान्यता देण्यात आली आणि त्यांचा सत्कार करण्यात आला. सोशल मीडिया, प्रेस, पॉडकास्ट इ. च्या माध्यमातून वर्षभर विजेत्यांचा गौरव करण्यात आला. या वर्षी भारताच्या जोडीलाच हा उपक्रम भारत, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, बांगलादेश, नेपाळ, इंडोनेशिया आणि आफ्रिकेतील उत्कृष्ट व्यवसायांचाही सत्कार करेल.