Home मनोरंजन रिऍलिटी शोने बदललं रिअल आयुष्य!

रिऍलिटी शोने बदललं रिअल आयुष्य!

6 second read
0
0
33

no images were found

रिऍलिटी शोने बदललं रिअल आयुष्य!

स्टार प्रवाहवर सध्या सुरु असलेला ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा’ कार्यक्रम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतो आहे. बच्चेकंपनीचे एकापेक्षा एक परफॉर्मन्स या कार्यक्रमाची शोभा वाढवत आहेत. कॅप्टन फुलवा खामकर आणि वैभव घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे छोटे दोस्त मंचावर नवनवे प्रयोग सादर करत आहेत. वैभव घुगे आणि फुलवा खामकर यांच्यासोबतच आणखी एक नृत्यदिग्दर्शिका सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे आणि ती आहे कोमल सुर्वे. मी होणार सुपरस्टारच्या याआधीच्या पर्वात मंचावर कोमल महाअंतिम फेरीपर्यंत पोहोचली होती. नृत्यदिग्दर्शिका होण्याचं तिचं स्वप्न याच मंचामुळे साकार झालं आहें. ज्या मंचावर स्पर्धक म्हणून टॅलेण्ट दाखवण्याची संधी मिळाली त्याच मंचावर मी आता स्पर्धकांना शिकवते आहे ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. या मंचाने खूप गोष्ट शिकवल्या. आठवणीत रहाणाऱ्या असंख्य क्षणांचा हा मंच साक्षीदार आहे. त्यामुळे या मंचावर पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळते आहे हे सुखावणारं आहे.

वयाच्या ५ व्या वर्षी कोमलने नृत्याचे धडे गिरवायला सुरुवात केली. आईच्या पुढाकाराने गुरु रत्नाकर शेळके यांच्याकडे कोमलने नृत्याचं शिक्षण घेण्यास सुरुवात केली. बॉलीवूड आणि लोकनृत्य शिकल्यानंतर कोमलने भरतनाट्यम शिकण्यास सुरुवात केली. इतकंच नाही तर लॅटिन स्टाईल, कण्टेम्पररी, जॅझ असे नृत्याचे विविध प्रकार कोमलने आत्मसात केले. अनेक रिऍलिटी शोच्या मंचावर तिने ग्रुपमध्ये आपलं टॅलेण्ट दाखवलं. मात्र स्टार प्रवाहच्या मी होणार सुपरस्टार कार्यक्रमामुळे ती प्रकाशझोतात आली. कोमलच्या परिवारात सर्वांनाच कलेची आवड आहे. मात्र कोमलने नृत्याची आवड करिअर म्हणूनच पुढे नेण्याचं ठरवलं आहे. मी होणार सुपरस्टार या रिऍलिटी शोने कोमलंच रिअल आयुष्य बदललं आहे.  कोमल प्रमाणेच अनेक स्पर्धकांना नवनव्या संधी या मंचाने दिल्या आहेत. त्यामुळे हा मंच म्हणते फक्त स्पर्धा नाही तर खऱ्या अर्थाने दिशादर्शक ठरतोय. 

 

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…