Home सामाजिक मुंबई-गोवा महामार्गावरील दुपदरी रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वीच पूर्ण करावीत – रविंद्र चव्हाण

मुंबई-गोवा महामार्गावरील दुपदरी रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वीच पूर्ण करावीत – रविंद्र चव्हाण

4 second read
0
0
28

no images were found

मुंबई-गोवा महामार्गावरील दुपदरी रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वीच पूर्ण करावीत – रविंद्र चव्हाण

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर ते झाराप मार्गावरील रस्त्याची कामे युद्धपातळीवर पूर्ण करुन पावसाळ्यापूर्वी किमान दोन पदरी रस्ता पूर्णपणे तयार करावा. नवी मुंबई येथील कोकण भवन मधील राष्ट्रीय महामार्ग कार्यालयात मुंबई- गोवा महामार्गाच्या कामाच्या प्रगतीबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मंत्री श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यामध्ये रायगडमधील पळस्पे ते इंदापूर, रत्नागिरीमधील अरवली ते वाकेड व कशेडी घाटातील प्रलंबित रस्त्यांचा समावेश असून ही सर्व रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले आहेत.

गुहागर चिपळूण कराड रस्त्याच्या चिपळूण तालुक्यातील पिंपळी-बुद्रुक ते कुंभार्ली घाटमाथा या एकूण २१ कि.मी. भागाचे दुपदरीकरण करुन उन्नतीकरण करण्याचा प्रस्ताव मंजूर करणे, आणि चिपळूण पागनाका (७०० मी.) व सावर्डे शहरामध्ये उड्डाण पूल (१२५० मी.) हे काम चालू वर्षाच्या वार्षिक आराखड्यामध्ये समाविष्ट करुन रस्त्याची कामे मार्गी लावण्याच्या सूचना मंत्री चव्हाण यांनी मुख्य अभियंता, रस्ते परिवहन मंत्रालय व मुख्य अभियंता, राष्ट्रीय महामार्ग यांना दिल्या.

 

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…