
no images were found
राष्ट्रवादीतच कायम राहणार’, अजित पवार
गेल्या काही दिवसांपुर्वी अजित पवार पुणे दौऱ्यावर असताना अचानक नॉट रिचेबल झाले होते. त्यानंतर पहाटेच्या शपथविधीची चर्चा सुरु झाली. मात्र त्यावर अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले होते. मात्र आता अजित पवार पुन्हा भाजपसोबत जाणार असल्याचे वृत्त प्रसिध्द झाले होते. त्यामुळे अजित पवार चर्चेत आहेत. मात्र या चर्चांवर अजित पवार यांनी उत्तर दिले आहे.कारण नसताना माझ्या आणि माझ्या सहकाऱ्यांबद्दल गैरसमज पसरवला जात आहेत. जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न सुरु आहे.या बातम्यांमध्ये कोणतंच तथ्य नाही, असं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांच्या भाजप प्रवेशाबाबतच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं.
कारण नसताना माझ्याबाबत आणि माझ्या सहकाऱ्यांबाबत गैरसमज निर्माण करण्याचं काम सुरु आहे.भाजप प्रवेशाच्या बातम्यांमध्ये काहीच तथ्य नाही माझ्याबाबत चुकीच्या बातम्या दाखवल्या जात आहेत.40 आमदारांच्या सह्या घेतलेल्या नाहीत. आम्ही राष्ट्रवादीत राहणार आहोत. इतर राजकीय पक्षाचे नेते याबाबत बोलत आहेत मात्र मी त्याबाबत बोलणार नाही प्रत्येक मंगळवारी आमदार मला भेटतात, हे नेहमीचे आहे. अनेक आमदारांचं काम होतं म्हणून आले होते, त्याचा वेगळा अर्थ काढू नका आमदारांबाबत चुकीच्या बातम्या देऊ नका कारण संभ्रम निर्माण होतं आहे. राष्ट्रवादी काँगेस पक्षात चढउतार आले आहेत. आम्ही तिथच राहणार आहोत. सध्या निर्माण झालेल्या प्रश्नांवरुन लक्ष विचलित करण्यासाठी हा प्रकार सुरु आहे जिवात जीव असेपर्यंत पक्षासोबत कायम राहाणार, पक्षाचं काम करणार. चर्चा थांबवा, तुकडा पाडा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमातील दुर्घटना ही सरकारनिर्मित आपत्ती, माणसाच्या जीवाशी हे का खेळले याचं उत्तर द्यावं. राजभवनला हॉलमध्ये हा सोहळा घेता आला असता मात्र यांनी निष्काळजीपणा नडला आहे. राजकारण्यांना राजकारण साधायचं होत का? सरकारने या प्रकरणी संवेदनशीलता दाखवली नाही 40 आमदारांच्या सह्या घेतल्याचं वृत्त, अजित पवारांचं स्पष्टीकरण