
no images were found
1500 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्यात हसन मुश्रीफांची चौकशी; लोकायुक्तांद्वारे 24 ऑगस्टला सुनावणी
मुंबईः भाजप नेते किरीट सोमय्या यांनी माजी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबावर मागील वर्षी भ्रष्टाचाराचा आरोप केला. त्यांच्या मते मुश्रीफ यांच्या कुटुंबियांनी तब्बल 100 कोटी रुपयांचा घोटाळा केलाय. मुश्रीफ यांच्या कुटुंबियांकडे 47 कंपन्यांकडून पैसे आले असून कोणत्या कंत्राटदारांकडून हा पैसा आला, याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकार असताना केली होती. तसेच मुश्रीफांची बेनामी संपत्ती जप्त करा, अशी मागणीदेखील त्यांनी केली होती. शेल कंपन्यांतून मुश्रीफ यांच्याकडे हा पैसा आला असून ठाकरे सरकारने या प्रकरणी चौकशी का केली नाही, असा सवाल तेव्हा किरीट सोमय्यांनी केला होता. भारत सरकारने मुश्रीफांविरोधात पुणे सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंत्रिपदावर असताना भ्रष्ट पद्धतीने जावयाच्या कंपनीला 1500 कोटी रुपयांचे कंत्राट मिळवून दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हा भ्रष्टाचार उघडकीस आणला होता. आता या प्रकरणाची लोकायुक्तांद्वारे चौकशी सुरु झाली आहे. तसेच लोकायुक्तांसमोर येत्या 24 ऑगस्ट रोजी यासंदर्भातील सुनावणी होईल. त्यामुळे मंत्रिपदाच्या कारकीर्दीत केलेला भ्रष्टाचाराचा हिशोब हसन मुश्रीफ यांना द्यावाच लागेल, असं मत किरीट सोमय्या यांनी व्यक्त केले आहे.