
no images were found
महाराष्ट्राचा प्पपू होऊ नये -विखे पाटील
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बंड करण्यापूर्वी मातोश्री येऊन रडले होते. भाजपसोबत गेलो नाहीतर ते मला जेलमध्ये टाकतील, असे म्हणाले होते. असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे यांनी केला होता. त्यावरुन भारतीय जनता पक्षाचे नेते तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करत खोचक सल्लाही दिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदीनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, हातून सत्ता गेल्यानंतर त्यांना शहाणपण येईल, असे मला वाटत होते. पण तसे काही झालेले नाही. एकनाथ शिंदे हे रडणारे नेते नाहीत, लढणारे नेते आहेत याची प्रचिती महाराष्ट्राने अनुभवली आहे. सत्ता गेल्याने आदित्य ठाकरे वैफल्यग्रस्त झाले आहे. त्यामुळे स्वतःलाच रडू आवरत नाही.
आपल्या विधानावर थोडा आवर घातला पाहीजे. आपल्यापुढे अजून मोठे आव्हान आहे, मोठ्यांचा आदर करायला शकले पाहीजे. आपल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राचा पप्पू होवू नये याची काळजी त्यांनी घ्यायला हवी, असा खोचक सल्ला राधाकृष्ण विखे पाटील यांनी आदित्य ठाकरे यांना दिला.
तर रवी राणा म्हणाले की,’आदित्य ठाकरे हे बालिशपणे वक्तव्य करत आहेत. एखादा माणूस हताश, निराश होतो तेव्हा असं बोलतो. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे दोघंही निराश झालं असून त्यांना हेदेखील समजलं आहे की शरद पवारही त्यांची साथ सोडतील. त्यामुळेच आता एकनाथ शिंदेंवर आरोप केला.” असं म्हणत रवी राणा यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी ही टीका केली आहे.