no images were found
हसन मुश्रीफांच्या अटकपूर्व जामीनावर आज फैसला
कोल्हापूर : ईडीने आमदार हसन मुश्रीफ यांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर अटकपूर्व जामीनावर निर्णय होणार आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ यांना दिलासा मिळणार की कोठडीत रवानगी होणार?याकडे कोल्हापूर जिल्ह्यासह राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. मुंबईतील विशेष न्यायालयाने हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणी पार पडल्यानंतर निर्णय राखून ठेवला होता. त्यामुळे ईडी प्रकरणात मुश्रीफांना अटकेपासून दिलेलं संरक्षण कायम होते.
ईडीकडून करण्यात आलेल्या दाव्यानुसार, “मुश्रीफ यांनी तपासात सहकार्य केलेलं नाही आणि तीन समन्स बजावूनही ते हजर झाले नाहीत आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरच हजर झाले. ” सरसेनापती संताजी शुगर घोरपडे साखर कारखाना लिमिटेडचे शेअर्सच्या रुपात शेतकर्यांकडून 10 हजार रुपये घेतल्याचा आरोप आहे.
तर दुसरीकडे मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ सुरुच असून आणखी ६७ शेतकऱ्यांनी कोल्हापूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषणकडे तक्रार दाखल केल्याने आतापर्यंत दाखल झालेल्या तक्रारींची संख्या १०८ वर पोहोचली आहे. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे सभासदत्व देतो, असे सांगून फसवणूक केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी मुश्रीफ यांच्यावर केला आहे.