no images were found
डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये
सिक्स सिग्मा येलो बेल्ट कार्यशाळा संपन्न
कसबा बावडा/ वार्ताहर
डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महावियालयाच्या मेकॅनिकल डिपार्टमेंटच्या ‘लिन क्लब’ च्यावतीने ‘सिक्स सिग्मा येलो बेल्ट’ ची दोन दिवसीय कार्यशाळा उत्साहत संपन्न झाली. सिक्स सिग्मा समुपदेशक ओंकार कुलकर्णी आणि एमएसएमई टेक्नोलॉजीचे प्रतीक परशार यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.
सध्याच्या क्षेत्रामध्ये आपण सिक्स सिग्मा या तंत्रज्ञानाचा वापर कशाप्रकारे करावा याची सखोल माहिती ओंकार कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना दिली. तसेच औद्योगिक क्षेत्रामधील विविध विभागांमध्ये कोणत्या प्रकारे कार्य चालते आणि त्यामध्ये आपण सिक्स सिग्माचा कसा उपयोग करावा याचे ज्ञान देण्यात आले. मेकॅनिकल विभागातील अभ्यास आणि सध्याच्या औद्योगिक क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान यांची सांगड घालण्याचा प्रयत्न कार्यशाळेच्या माध्यमातून करण्यात आला. कार्यशाळा संपन्न झाल्यानंतर विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन गुणवत्तेच्या आधारावर प्रशस्तीपत्र देण्यात आले. कार्यशाळेसाठी सुमारे शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी डी पाटील आणि विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ.ए.के गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य डॉ. एस .डी चेडे, रजिस्ट्रार डॉ. लीतेश मालदे, विभाग प्रमुख डॉ.सुनील रायकर, लिंन क्लबचे डॉ. गुजर, विराज पसारे, उत्कर्ष पाटील आणि अजिंक्य नलगे शिवाय विभागातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.