no images were found
हनुमान जयंती वर केंद्रीय गृहमंत्रालयाची सर्व राज्यांसाठी अॅडव्हायझरी
उद्या होणाऱ्या हनुमान जयंती देशभरात साजरी होणार आहे. पण राम नवमीच्या दिवशी देशातील विविध भागांत गोंधळ झाल्याच्या घटना घडल्या. या घटनेत समाज कटंकामुळं अनेक नागरिकांचं नुकसान झालं. या घटनांमुळे काही भागात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला होता.यामुळे अमित शहा यांचं केंद्रीय गृहमंत्रालय अलर्ट झालं असून गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यांना महत्वाचे निर्देश दिले आहेत
हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयानं नवी अॅडव्हाजरी जाहीर केली आहे. यामध्ये सर्व राज्यांना हनुमान जयंतीनिमित्त कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हनुमान जयंतीदिनी काही विपरीत घटना घडल्यास सहन केल्या जाणार नाही, असा इशाराच देण्यात आला आहे.
सणानिमित्त सर्वत्र शांतता राहावी तसेच समाजातील कोणी जातीय सलोख्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतंय का? याकडं राज्यांच्या पोलिसांनी लक्ष द्यावं, असंही या अॅडव्हाजरीमध्ये गृहमंत्रालयानं म्हटलं आहे.दरम्यान, राम नवमीच्या दिवशी महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर आणि जळगावमध्ये हिंसाचार झाला होता. तसेच पश्चिम बंगाल, गुजरात, बिहार या राज्यांमध्येही हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळं उत्सवाला गालबोट लागलं होतं. यावरुन बरेच राजकीय आरोप-प्रत्यारोपही पहायला मिळाले होते.