
no images were found
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठी कारवाई
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्तीची नामुष्की ओढवली आहे. न्यायालयाने आदेश देऊनही नुकसानभरपाईचा निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने जयसिंगपूर दिवाणी न्यायालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयातील जंगम मालमत्ता जप्तीचा आदेश काढण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुरुंदवाडमधील वसंत राजाराम संकपाळ व कुरुंदवाड नगरपरिषदेत प्रदीर्घ काळापासून न्यायालयीन लढा सुरु होता. यामध्ये वसंत राजाराम संकपाळ यांच्या बाजूने निकाल लागल्यानंतरही आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने न्यायालयाने हे आदेश देण्यात आले आहेत. १९८४ पासून हा खटला चालू होता. आता न्यायालयाने नुकसान भरपाईपोटी जिल्हाधिकारी कार्यालयावरच जप्तीचे आदेश काढले आहेत.
न्यायालयाने लेल्या आदेशानूसार खुर्च्या, लॅपटॉप, वाहन जप्त करण्याच्या कार्यवाहीसाठी अधिकारी व वकील देवराज मगदूम जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आहेत.
कुरुंदवाड येथील विकास आराखड्यासाठी घेतलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा यासाठीचा दावा न्यायालयात दाखल होता . हा दावा कुरुंदवाड येथील वसंत संकपाळ यांनी दाखल केला होता . कुरुंदवाड येथील रस्त्यासाठी जिल्हा प्रशासनाने संकपाळ यांची जमीन घेतली होती.
जमिनीच्या बदल्यात कुठलाही मोबदला न दिल्याने संकपाळ यांनी न्यायालयाचे सन १९८४ मध्ये दरवाजे ठोठावले होते . दरम्यान प्रशासनाने वारंवार दुर्लक्ष केल्याने न्यायालयाने नुकसान भरपाई म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्तीचे काढले आहे अशी माहिती संकपाळ यांनी दिली.