no images were found
संभाजीनगरात तुफान राडा, प्रचंड दगडफेक, पोलिसांची वाहनेही जाळली
संभाजीनगर :संभाजीनगरमधील किराडपुरा भागात रात्री दोन गटातक धक्का लागल्याने झालेल्या वादाचं पर्यवसान तुफान राड्यात झालं.धक्का लागल्याने दोन गटात बाचाबाची झाली. त्यानंतर दोन्ही गटाकडून जोरदार घोषणा देत जाळपोळ करण्यात आली. दगडफेक करण्यात आली. जमावाला पांगवण्यासाठी आलेल्या पोलिसांनाही या जमावाने टार्गेट केलं. पोलिसांवर दगडफेक करतानाच पोलिसांची वाहनेही पेटवून दिली. या राड्यात तब्बल 20 वाहने जाळण्यात आली आहे. त्यामुळे तणाव अधिकच वाढला. शेवटी पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आणि जमाव पांगण्यात आला. काल रात्री ही घटना घडली. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे. रामनवमी आणि रमजानमुळे किराडपूर परिसरासह औरंगाबादेतील संवेदनशील भागात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.संभाजीनगरच्या किराडपुरा भागात हा प्रकार घडला.
या राड्यात दुचाकी आणि चारचाकी अशी 20 वाहने जळून खाक झाली आहेत. यात पोलिसांच्या 10 ते 12 गाड्यांचा समावेश आहे. पोलिसांनी पहाटे पहाटेच या जळालेल्या गाड्या घटनास्थळावरून हटवल्या आहेत. या राड्याची चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी राडा करणाऱ्या तरुणांना अटक करण्यासाठी 10 पथके तयार केली आहेत. गल्लीबोळात जाऊन या दंगलखोरांना अटक केली जाणार आहे. त्यापैकी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. या तरुणाची चौकशीकडून त्याच्याकडून इतर समाजकंटकांची माहिती घेतली जात आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेजही तपासले जात आहेत. तर, या घटनेवर पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींना लोकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. मंदिराला कोणतही नुकसान झालेलं नाही. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका,