
no images were found
भाविकाचा अंबाबाई मंदिरात मृत्यू, घटनेनं हळहळ
कोल्हापूर : कोल्हापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दक्षिण भारताची सहल करून परतणाऱ्या अहमदनगर येथील भाविकाला अंबाबाई मंदिरातील दर्शन रांगेत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रामनाथ गबाजी जाधव वय 62 वर्ष रा. मोर्विस, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर असं मृत व्यक्तीचं नाव आहे. रामनाथ जाधव हे दक्षिण भारताची सहल करून परतत होते. त्यांनी कोल्हापुरात अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात रांग लावली. मात्र या रांगेत त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. उपचारासाठी सीपीआरमध्येनेण्याआले पण या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.
रामनाथ जाधव हे आपल्या चार मित्रांसह पंधरा दिवसांपूर्वी दक्षिण भारताच्या सहलीसाठी निघाले होते. सहलीहून परतताना त्यांनी कोल्हापूरमध्ये जाऊन अंबाबाईचं दर्शन घेण्याचा प्लॅन तयार केला. अंबाबाई मंदिरात दर्शन रांगेत गेल्यानंतर काही वेळाने अचानक त्यांच्या छातीत तीव्र कळ आली. रांगेतच कोसळल्याने त्यांना देवस्थान समितीच्या कर्मचा-यांसह मित्रांनी सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.