no images were found
नेहा जोशीचा विवाहानंतर पहिला गुढीपाडवा
गुढीपाडवा हा सण मराठी नववर्षाच्याप शुभारंभाचे प्रतीक आहे आणि महाराष्ट्री यन लोकांसाठी आनंदाचा सण आहे. चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी हा सण घरात भरभराट आणि सौभाग्य घेऊन येण्या्च्यात विश्वा सासह साजरा केला जातो. एण्डं टीव्ही वरील मालिका ‘दूसरी मॉं’मध्ये यशोदाची भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा जोशी महाराष्ट्राकतील नाशिक येथील आहे. ती तिच्याय विवाहानंतर पहिल्यांिदाच हा सण साजरा करण्यारसाठी उत्सातहित आहे. नेहा जोशी यंदाच्याय सण साजरीकरणाबाबत सांगताना म्ह णाली, ‘‘गुढीपाडवा सण महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. दिवसाच्या सुरुवातीला, प्रत्येक महाराष्ट्रीयन कुटुंब हार, कडुलिंबाची पाने व चमकदार कापडाने सजवलेली गुढी उभारतात. गुढी दुष्टह शक्तींटना दूर ठेवते आणि समृद्धी व चांगले भाग्य आणते असे मानले जाते. ही गुढी नवीन सुरुवात, आशा आणि आकांक्षांचे देखील प्रतीक आहे. तसेच लोक रांगोळ्या, रंग आणि फुलांनी त्यांची घरे सजवतात. विवाहानंतर हा माझा पहिला गुढीपाडवा असल्याने ओंकार आणि मी यावर्षी माझ्या माहेरी जाणार आहोत. या दिवशी आईवडिल आपल्या नवविवाहित मुलीला आणि त्यांच्या पतीला जेवणासाठी आमंत्रित करतात. पुरणपोळी, श्रीखंड यांसारखी मिष्टान्ने आणि आंबे डाळ व सुंठपाक हे पदार्थ यादिवशी बनवले जातात. मी माझ्या आईकडे या सर्वांची मागणी केली आहे (हसते). ती एक अप्रतिम कूक आहे आणि मी जयपूरमध्ये माझ्या ‘दूसरी मॉं’ मालिकेच्यात शूटिंगमध्येआ व्ययस्तम असल्या’मुळे मला माझ्या आईने बनवलेल्या जेवणाची आठवण येत आहे. पारंपारिक महाराष्ट्रीयन पोशाख, नऊवारी साडी, सुंदर दागिने आणि केसात मोगऱ्याच्या फुलांचा हार घालून माझा लूक पूर्ण करत मी सणाचा आनंद घेण्यामसाठी उत्सु क आहे.’’
अभिनेत्री पुढे म्होणाली, ‘‘सायंकाळी आम्हीक आमच्याी नातेवाईकांना भेटायला जातो, तसेच फेरफटका मारायला देखील जातो. सर्वात महत्त्वाचे म्हडणजे या शुभ सणाला मंदिरामध्येस जाऊन देवाचा आशीर्वाद घेतो. या दिवशी शहराचे आराध्य दैवत असलेल्या कलाम मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची नाशिकमधील परंपरा आहे. पण, शोभा यात्रा पाहणे खरंच पर्वणी आहे, ज्याआमध्ये महिला आकर्षक पोशाख परिधान करतात, हातामध्ये झेंडे धरतात आणि ढोल-ताशा वाजवतात. माझ्याकडून सर्वांना गुढीपाडव्या च्याख शुभेच्छात. हे वर्ष तुम्हाला सुख, आरोग्य आणि संपत्ती घेऊन येवो.’’