Home स्पोर्ट्स राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेत विद्यापीठाचा महिला संघ द्वितिय

राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेत विद्यापीठाचा महिला संघ द्वितिय

14 second read
0
0
122

no images were found

राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेत विद्यापीठाचा महिला संघ द्वितिय

कोल्हापूर, : चंदिगड येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ महिला सॉफ्टबॉल स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या महिला संघाने  साखळी सामन्यात कालिकत युनिव्हर्सिटी चा 4-2  असा तर दिल्ली विद्यापीठाचा तब्बल 17 – 1 असा पराभव करून  स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला. काल झालेल्या मानांकनाच्या सामन्यात कुरुक्षेत्र विद्यापीठाविरुद्ध शिवाजी विद्यापीठाने ४ – २ असा विजय मिळवून अंतिम चार संघात स्थान मिळवत साखळी डेरीत प्रवेश केला होता. आज पहिल्या साखळी सामन्यात कालिकत विद्यापीठाचा १ – ४ असा पराभव करून दोन गुणांची कमाई केली तर दुसऱ्याच सामन्यात दिल्ली विद्यापीठाला तब्बल १७ – १ असे हरवले. तिसऱ्या साखळी सामन्यात मात्र पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे शिवाजी विद्यापीठाच्या महिलांना एक शून्य असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे यजमान चंदिगड विद्यापीठ प्रथम, शिवाजी विद्यापीठ द्वितीय व कालिकत विद्यापीठ आणि दिल्ली विद्यापीठ संयुक्त तिसऱ्या स्थानावर राहिले.

        शिवाजी विद्यापीठाच्या यशात आंतरराष्ट्रीय खेळाडू स्वप्नाली वायदंडे हिने जोरदार पिचिंग केले. तिच्या पिचिंगपुढे संपूर्ण भारतातून आलेल्या एकाही खेळाडूचा निभाव लागला नाही. तिला कॅचर ऐश्वर्या पुरी हिने अचूक साथ दिली.  त्याचबरोबर करिष्मा कुडचे. पल्लवी कांबळे, साक्षी लगाडे, सुजाता थोरवडे, सृष्टी कदम व वेदश्री पाटील यांनी फलंदाजीमध्ये चांगली साथ दिली. 

विद्यापीठाचा संघ पुढीलप्रमाणे – स्वप्नाली वायदंडे (कर्णधार), ऐश्वर्या पुरी, करिष्मा कुडचे, पल्लवी कांबळे, सानिका संकपाळ, गौरी माळी, आलिशा कांबळे, सृष्टी कदम, निरुपमा कांबळे, वेदश्री पाटील  साक्षी लगाडे, सुजाता थोरवडे, निकिता जाधव, दीक्षा शिंदे, शितल जाधव, राधिका कळंत्रे, प्रशिक्षक सुशांत कायपुरे, संघ व्यवस्थापक डॉ. बाबासो उलपे. 

या संघाला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरु डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ विलास शिंदे, क्रीडा संचालक  डॉ. शरद बनसोडे यांचे प्रोत्साहन लाभले

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…